मावळ तालुक्यातील मुंढावरे गावामध्ये बेकायदेशीररित्या हातभट्टीद्वारे गावठी दारूचे उत्पादन घेतले जात असल्याची माहिती कामशेत पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घडक कारवाई करत मुंढावरे गावातील गावठी दारूची निर्मिती करणारी हातभट्टी उध्वस्त केली. पोलीस शिपाई अमोल महादेव ननवरे यांनी याबाबत कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ( Kamshet Police Maval Taluka Action Against Illegal liquor Business )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढावरे येथील दगडी खाणीच्या मागील बाजूस असणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या कंजारभट वस्तीजवळ आरोपी महिला नितू प्रतिक राठोड (रा. मुंढावरे, ता. मावळ) ही हातभट्टीत गावठी दारू तयार करत होती. अशुद्ध पाणी, नवसागर, विविध झाडांच्या मुळ्या, काळा गूळ एकत्रित करून मानवी जिवितास धोका निर्माण होईल असे विषारी रसायन असलेली गावठी दारू तयार करत होती.
कामशेत पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळाली. त्यानुसार मंगळवार (दिनांक 1 ऑक्टोबर) रोजी सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी कारवाई केली. पोलिसांना प्रकरण समजले असल्याची चाहूल लागताच आरोपी महिला तेथून फरार झाली. मात्र पोलिसांनी मारलेल्या छाप्यात एकूण 50 हजार रुपये किमतीची 1000 लीटर दारू आणि कच्चा माल नष्ट केला. पोलीस हवालदार सागर बनसोडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– मोरगिरी किल्ल्याच्या दरीत अडकलेल्या केरळच्या दुर्गवेड्या हमरासला शिवदुर्ग टीमकडून मदतीचा हात
– शिवणे-सडवली ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी रेखा थोरवत बिनविरोध