रायगड जिल्ह्याची कन्या कुमारी ऋचा कृष्णकांत दरेकर हिचे भारतीय लष्करात ‘लेफ्टनंट ऑफिसर’ म्हणून नियुक्ती झाली आहे. सध्या पनवेल येथे राहणारी मात्र मुळची पळसदरी येथील रहिवाशी असलेली ऋचा हिचे आठवीपर्यंतचे शिक्षण खोपोली येथील शिशु मंदिरात झाले, तर आठवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण तिने पनवेल येथील बार्न्स हायस्कूलमध्ये घेतले होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
ऋचा हिने जिल्हा आणि राज्य स्तरावर तलवार बाजी खेळामध्ये सुवर्ण पदके मिळवली असून ती राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू देखील आहे. ऋचाने रसायनी येथील पिल्लई कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग मधून पदवी प्राप्त केली आहे. ( Raigad District Karjat Taluka Citizen Rucha Darekar Appointed as Lieutenant Officer In Indian Army )
केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत घेतली घेतली जाणारी सीडीएस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे ती एसएसबी मुलाखती मध्ये उत्तीर्ण झाली. त्यामुळे तिला चेन्नई येथे ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी (ओटा) येथे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. नुकतेच तिने प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले असून पासिंग आऊट परेड झाली आहे. त्यानंतर आता ऋचा ही भारतीय लष्करात लेफ्टनंट ऑफिसर म्हणून नियुक्त झाली आहे. सध्या ऋचाचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदन केले जात आहे.
अधिक वाचा –
– मोरगिरी किल्ल्याच्या दरीत अडकलेल्या केरळच्या दुर्गवेड्या हमरासला शिवदुर्ग टीमकडून मदतीचा हात
– मावळ तालुका सहकारी ग्रामोद्योग संघाची निवडणूक बिनविरोध, बहुतांश विद्यमान संचालकांचीच संघावर पुन्हा वर्णी