तळेगाव दाभाडे ( Talegaon Dabhade ) येथील अॅड. पु. वा. परांजपे विद्यामंदिर ( Adv P V Paranjape High School ) शाळेतील 1997/ 1998 या इयत्ता दहावीच्या बॅचचा स्नेह मेळावा ( Alumni Gathering ) तळेगाव दाभाडे येथील ईशा हॉटेलमध्ये नुकताच पार पडला. त्यानिमित्ताने साधारण 24 वर्षानंतर 16 शिक्षक आणि विद्यार्थी असे एकूण शंभर जण एकत्र आले होते. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मनोगत व्यक्त करताना शालेय जीवनातील कडू गोड आठवणींना उजाळा दिला. ( Adv P V Paranjape High School Talegaon Dabhade Alumni Gathering )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शिक्षकांतर्फे लिमये सर, मुळे सर, अंभोरे सर, वंजारे सर, कुलकर्णी मॅडम, पंचपोर मॅडम, गायकवाड मॅडम या शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच माजी विद्यार्थिनींनी स्वागत गीत व अभंग गायन केले. विद्यार्थ्यांनी एकत्र येत सध्या आपण नक्की काय करतोय व या आपल्या जीवनामध्ये शिक्षकांचे नक्की कसे योगदान आहे याच्याबद्दल माहिती दिली, अनेकांनी स्वतः चे अनुभव कथन केले. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एक पालक म्हणून मार्गदर्शन केले आणि या निमित्ताने अशा सर्व शिक्षकांना एकत्र आणल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक देखील केले.
साधारण 24 वर्षांपूर्वी शिक्षक असणारे आता सर्वजण हे शिक्षक पेशातून निवृत्त होऊन एक चांगले आयुष्य जगत आहेत. आपल्या माजी विद्यार्थ्यांची अशी गोड भेट होईल, असे काही शिक्षकांना वाटले देखील नव्हते. मात्र विद्यार्थ्यांनी प्रयत्न करून घडून आणलेल्या या स्नेहसंमेलनामध्ये अनेक शिक्षकांना आपले शिक्षक असतानाचे कार्य आठवले.
विद्यार्थ्यांच्या हस्ते सर्व शिक्षकांचा शाल, पुष्प, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि कुंडीसह तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. तसेच यापुढेही सर्वांनी एकत्र येऊन समाज उपयोगी कार्य तसेच स्नेह मेळावा अशा प्रकारचे कार्यक्रम नियोजन करू असे सांगितले. सर्वांनी कार्यक्रम संपल्यानंतर सुंदर अशा भोजनाचा आस्वाद घेत सूर ताल पकडून भावगीत, गराडे यांचा भक्तीगीत, जुन्या काळातील गाण्याच्या भेंड्या खेळल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गराडे यांचा तांबोळी यांनी केले, तर सूत्रसंचालन वैशाली कोयते व प्रशांत ताये यांनी केले, तर आभार प्रदर्शन नरेंद्र टकले यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संजय शेळके, विकास राते दीपक फाकटकर, सुयोग गुरव, नरेंद्र टकले, प्रशांत ताये, जहीर तांबोळी, संदीप गडसिंग, अपर्णा ढोबळे, मयुरी आपटे, वैशाली कोयते व सुषमा दाभाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळेस वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे यांचा तळेगाव दाभाडे नगरपरिषद वृक्ष संवर्धन समिती सदस्य, वन्यजीव रक्षक मावळ संस्था संस्थापक तसेच अत्यावश्यक सेवेतील त्यांच्या सामाजिक कार्याचा विशेष सन्मान शिक्षकांमार्फत करण्यात आला. विद्यार्थ्यांचे शालेय जीवनातील कटू तसेच गोड आठवणी देखील सांगताना सर्व शिक्षकांसमवेत विद्यार्थ्यांना गहिवरून आले होते.
अधिक वाचा –
– ऋचा दरेकर हिची भारतीय लष्करात ‘लेफ्टनंट ऑफिसर’ म्हणून नियुक्ती
– कामशेत पोलिसांची धडक कारवाई, मुंढावरे गावातील गावठी दारूची निर्मिती करणारी हातभट्टी उध्वस्त