व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सॉल्लिड कामगिरी! कामशेत पोलिसांकडून गहाळ झालेल्या 19 मोबाईलचा शोध, थेट कर्नाटकातून हस्तगत केले फोन । Maval Crime

काही कारणास्तव जेव्हा हा मोबाईल चोरी होतो किंवा गहाळ होतो, तेव्हा होणारा मनस्ताप प्रचंड असतो. अनेक कामे त्यामुळे खोळंबतात आणि त्रास सहन करावा लागतो.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 11, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
kamshet-police-maval

Photo Courtesy : Kamshet Police


मोबाईल फोन हा हल्ली प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत गरजेचा बनला आहे. मोबाईलचा होणारा बहुविध उपयोग यामुळे त्यावरील अवलंबित्व वाढलं आहे. परंतू काही कारणास्तव जेव्हा हा मोबाईल चोरी होतो किंवा गहाळ होतो, तेव्हा होणारा मनस्ताप प्रचंड असतो. अनेक कामे त्यामुळे खोळंबतात आणि त्रास सहन करावा लागतो. आपले सीम कार्ड, संपर्क क्रमांक, फोटो, व्हिडिओ, आर्थिक व्यवहाराचे अॅप अशा अनेक गोष्टी हातात नसल्याने अडचण होऊ लागते. तेव्हा पहिला उपाय अथवा पर्याय म्हणून नागरिक पोलिस ठाण्यात जाऊन त्याबाबत तक्रार नोंदवतात. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

किमान पोलिस तरी त्यांचा मोबाईल फोन लवकरात लवकर शोधून परत मिळवून देतील, अशी त्यांची अपेक्षा असते. याच पार्श्वभूमीवर कामशेत पोलिस स्टेशन (ता. मावळ) येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनी गहाळ मोबाईल फोनचा शोध तातडीने घेण्याकरिता पथक तयार केले होते. सदर पथकाकडून गहाळ झालेल्या मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण करुन मोबाईल फोनचा शोध घेतला. या कारवाईत कर्नाटक राज्यातून तब्बल 19 मोबाईल फोनचा शोध घेऊन ते कामशेत पोलिसांनी हस्तगत केले. ( kamshet police recovered 19 missing mobile phones maval crime )

त्यानंतर आज, गुरुवार (दि. 11 जानेवारी) सदरील मोबाईल फोन हे लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक आणि पोलिस निरिक्षक रविंद्र पाटील यांच्या उपस्थितीत मुळ मालकांना देण्यात आले. यावेळी मोबाईल मालकांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान अवर्णनीय होते. फोन परत मिळवून दिल्याबद्दल मोबाईल मालकांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या आणि कामशेत पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्या मागर्दशनाखाली सपोनि नितीन नम, पोसई शुभम चव्हाण, पोसई दत्तात्रय शेडगे, पो. हवा. मनोज माने, पो. हवा. गणेश तावरे, पो. हवा. समीर करे, पो. हवा रविंद्र राय, पो. ना. सचिन निंबाळकर यांच्या पथकाने केली.

अधिक वाचा –
– मोठा निर्णय! पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत आता भूमिहिनांना मिळणार 1 लाखांचे अनुदान
– मोठी बातमी! श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वाटपाचा शिंदे सरकारचा निर्णय
– भंडारा डोंगर तीर्थक्षेत्र विकासासाठी आराखडा सादर करा; पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजित पवारांचे निर्देश । Ajit Pawar


dainik maval jahirat

Previous Post

पवना आणि टाटा धरण क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रालय स्तरावर विशेष बैठक संपन्न । Maval News

Next Post

लोणावळ्यात दिसली सामान्यांची ताकद! विविध प्रलंबित मागण्यांसाठी रेल रोको आंदोलन, डेक्कन क्विन रोखल्याने रेल्वे प्रशासनाची धावपळ । Lonavala Railway Movement

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
rail-roko-lonavala

लोणावळ्यात दिसली सामान्यांची ताकद! विविध प्रलंबित मागण्यांसाठी रेल रोको आंदोलन, डेक्कन क्विन रोखल्याने रेल्वे प्रशासनाची धावपळ । Lonavala Railway Movement

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.