मावळ तालुक्यातील पवना आणि टाटा धरण क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसंदर्भात बुधवारी (दि. 10 जानेवारी) राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
टाटा कंपनीच्या धरणांमुळे मावळ तालुक्यातील सुमारे तेरा गावे पुनर्वसित झाली. टाटा धरण झाल्यावर विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या वस्तीला गावठाण दर्जा देऊन त्याचे पुनर्वसित गावठाण घोषित करावे. या पुनर्वसित गावांना अद्यापही गावठाणाचा दर्जा मिळालेला नसल्याने येथे मूलभूत सोयी-सुविधाही पुरविल्या जात नाहीत. टाटा कंपनीने येथील मुलभुत सुविधा व विकासकामांसाठी सीएसआर फंड उपलब्ध करावा. तसेच टाटा धरणग्रस्तांच्या वारसांना प्रकल्पग्रस्त असल्याचा दाखला मिळावा, अशा विविध मागण्यांवर या बैठकीत चर्चा झाली.
- पवना धरणग्रस्तांसाठी अनेक बैठका झाल्या असून पुढील एक महिन्याच्या आत महसूल व वनविभागने प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठीचे क्षेत्र तात्काळ पुनर्वसन विभागाकडे उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.
- टाटा धरणातील प्रकल्पग्रस्तांना लवकरच दाखले वाटप करण्याची प्रक्रिया करण्यात येईल तसेच वस्त्यांना गावठाण घोषित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्रिमहोदयांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
याबैठकीस आमदार सुनिल शेळके यांच्यासोबत आंदर मावळ टाटा धरणग्रस्त समितीचे कार्याध्यक्ष नारायण ठाकर, उपसभापती मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती नामदेव शेलार, माजी चेअरमन शांताराम लष्करी, धरणग्रस्त समिती पदाधिकारी नारायण बोडके, निकेतन पालकर, माजी सरपंच भरत जोरी, मारुती मराठे, विशाल मराठे, संतोष कडू, राम कालेकर, दत्तात्रय ठाकर, संजय खैरे, रविकांत रसाळ, बाळासाहेब काळे आदी उपस्थित होते. ( special meeting at Ministry level regarding various demands of project victims of pavana and tata dam )
अधिक वाचा –
– मोठी बातमी! श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वाटपाचा शिंदे सरकारचा निर्णय
– भंडारा डोंगर तीर्थक्षेत्र विकासासाठी आराखडा सादर करा; पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजित पवारांचे निर्देश । Ajit Pawar
– महत्वाचे! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी पुन्हा ब्लॉक, पाहा कुठे आणि किती कालावधीसाठी असेल ट्राफिक ब्लॉक । Mumbai Pune Expressway