व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, February 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शाब्बास…! एकविरा विद्या मंदिर शाळेचे 5 विद्यार्थी एन.एम.एम.एस. परीक्षा गुणवत्ता यादीत चमकले । Karla News

कु. समृद्धी काळे खुल्या संवर्गातून पुणे जिल्ह्यात सातवी तर अनुसुचित जाती संवर्गातून प्रथम.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 15, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
Ekvira Vidya Mandir School Karla

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या श्री एकविरा विद्या मंदिर शाळेतील 5 विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृती परीक्षा अर्थात एन.एम.एम.एस. परीक्षेत पुणे जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत. यामध्ये कु. समृद्धी राहुल काळे ही विद्यार्थीनी खुल्या संवर्गातून संपूर्ण पुणे जिल्ह्यात सातवी, तर अनुसुचित जाती संवर्गातून संपूर्ण पुणे जिल्ह्यातून पहिली आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या अर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृती परीक्षेत श्री एकविरा विद्या मंदिरातील कु. समृद्धी काळे, कु. प्रणाली दिपक नरवडे, कु. ज्ञानेश्वरी संतोष हुलावळे, कु. अनिशा गणेश गायकवाड आणि कु. कृष्णा हरिचंद्र केदार या पाच विद्यार्थ्यांंची शिष्यवृतीसाठी निवड झाली असून सदर विद्यार्थांंना पुढील शिक्षणासाठी साठ हजार रुपये शिष्यवृती मिळणार आहे. ( Karla Ekvira Vidya Mandir School Students Get Success In NMMS Scholarship Examination )

सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक उमेश किसन इंगुळकर हे दरवर्षी शाळेचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत आणून असून आतापर्यंत 23 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले असून यावर्षी देखील 5 विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत आणत शाळेच्या आणि नु.म.वि. संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचे काम करत असल्याने, त्यांच्यावरही अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.

तसेच महाराष्ट्र शासनाच्या सारथी योजनेअंतर्गत छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्तीसाठी कु. श्रावणी उत्तम तरस, कु. अनुष्का सोपान येवले, कु. श्रृती गणेश देवकर, कु.रोहित अंकुश हुलावळे, कु. स्नेहा अनिल नाणेकर, कु.गौरव सोमनाथ गायकवाड, कु. मंथन गणपत ढाकोळ, कु. कावेरी भोजराज तरोणे या विद्यार्थांंची निवड झाली आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री संजय भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के, शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे, मुख्याध्यापक संजय वंजारे, सरपंच दिपाली हुलावळे, उपसरपंच किरण हुलावळे, संस्था संचालक मंडळ, सर्व कार्ला ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे शिक्षक शिक्षेकेतर कर्मचारी तसेच परिसरातील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

अधिक वाचा –
– देवघर येथे रंगला एकविरा देवीचा भाऊ श्री काळभैरवनाथ महाराजांचा पालखी मिरवणूक सोहळा, हजारो भाविकांची उपस्थिती । Karla Ekvira Devi Yatra
– किल्ले तिकोणा गडावर यंदाही जल्लोषात साजरी होणार श्रीराम नवमी । Tikona Fort
– मोरया प्रतिष्ठानची ‘सफर गड दुर्गांची’ पाचवी मोहिम किल्ले तिकोणा गडावर, 90 बालकांचा सहभाग । Vadgaon Maval


Previous Post

‘मावळ मतदारसंघातील सर्व 25 लाख मतदार हे माझे नातेवाईक’, नात्यागोत्याच्या राजकारणावर श्रीरंग बारणेंचे रोखठोक उत्तर

Next Post

‘मावळ लोकसभेच्या विकासासाठी ‘मशाल’ चिन्ह लक्षात‌ ठेवा’, संजोग वाघेरेंच्या गावभेट दौऱ्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sanjog Waghere Maval Lok Sabha

'मावळ लोकसभेच्या विकासासाठी 'मशाल' चिन्ह लक्षात‌ ठेवा', संजोग वाघेरेंच्या गावभेट दौऱ्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

voting

मावळात २ लाख ३१६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क ; मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट तर पंचायत समितीच्या 10 जागा

February 6, 2026
pune police

महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – जाणून घ्या नियम

February 6, 2026
Nagar Parishad Nagar Panchayat Ward wise reservation announced Many interested candidates in Maval election 2025

मावळात छुपा प्रचार जोरात… जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर वैयक्तिक गाठीभेटी वाढल्या

February 6, 2026
Maharashtra State Election Commission

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : संपूर्ण जिल्ह्यात २३ हजार तर मावळात १ हजार ६१२ मनुष्यबळाची नियुक्ती

February 6, 2026
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान ; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

February 5, 2026
Kusgaon Budruk Kale Zilla Parishad group BJP likely to confirm Bhausaheb Gund candidacy

काले-कुसगाव जि.प. गट : गणरायाचा आशीर्वाद घेऊन भाऊसाहेब गुंड यांच्याकडून सांगता दिवशी जोरदार प्रचार

February 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.