व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘मावळ मतदारसंघातील सर्व 25 लाख मतदार हे माझे नातेवाईक’, नात्यागोत्याच्या राजकारणावर श्रीरंग बारणेंचे रोखठोक उत्तर

मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व 25 लाख मतदार हे माझे नातेवाईक आहेत, असे मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी म्हटले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 15, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
mp-shrirang-barne-pc

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व 25 लाख मतदार हे माझे नातेवाईक आहेत, असे मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी म्हटले आहे. कासारवाडी येथे आज, सोमवारी (दि. एप्रिल) मावळ लोकसभेचे शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी-आरपीआय-रासप व मित्रपक्षांच्या महायुती चे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या निवडणूक प्रचाराबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत असताना बारणे यांनी वरील विधान केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

मावळ लोकसभा मतदारसंघातील 25 लाख मतदार माझे नातेवाईक – बारणे
पत्रकार परिषदेदरम्यान प्रश्नोत्तर सुरु असताना माध्यम प्रतिनिधींना बारणेंना, महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून नात्यागोत्याचे राजकारण केले जात असल्याबद्दल विचारण्यात आले. त्यावर बोलताना बारणे यांनी, या मतदारसंघातील सर्व 25 लाख मतदार हे माझे नातेवाईक व हितचिंतक आहेत, असे म्हटले. तसेच देशाची सुरक्षितता व गतिमान विकास यासाठी नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान व्हावेत, अशी देशातील बहुतांश नागरिकांची भावना आहे. त्याचबरोबर गेल्या दहा वर्षात मी केलेले काम आणि मतदारसंघात सातत्याने ठेवलेला संपर्क यामुळे आपण विक्रमी मताधिक्याने निवडून येऊ, असा विश्वासही बारणे यांनी व्यक्त केला. ( Maval Lok Sabha Constituency Shiv Sena Candidate Shrirang Barane Press Conference )

समोरच्या उमेदवाराचे किती आव्हान असेल?
समोरच्या उमेदवाराचे तुम्हाला किती आव्हान असेल? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधी यांनी खासदार बारणे यांना विचारला. त्यावर बोलताना त्यांनी, समोर कोण उमेदवार आहे माहिती नाही, असे म्हणत ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांचे कोणतेही आव्हान आपल्या समोर नसल्याचे सांगितले. परंतू लागलीच त्यांनी, माझ्या बोलण्याचा गैरअर्थ काढू नका, उमेदवारी अर्ज भरल्यानंतर समोर कोण उमेदवार आहे, हे स्पष्ट होईल, असे तत्काळ स्पष्टीकरण बारणे यांनी दिले.

यावेळी माजी खासदार अमर साबळे, आमदार उमा खापरे, अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, भाजपच्या शहराध्यक्ष शंकर जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, मावळ मतदार संघ समन्वयक सदाशिव खाडे, रासपचे कार्याध्यक्ष परमेश्वर बुरले, उपाध्यक्ष अजित चौगुले तसेच अमित गोरखे, सुजाता पलांडे, नामदेव ढाके, अनुप मोरे, राजू दुर्गे, नीलेश तरस, मोरेश्वर शेडगे, माऊली थोरात, नारायण बहिरवाडे, राजेश पिल्ले, संजय मंगोडेकर, कुणाल वाव्हळकर आदी प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

अधिक वाचा –
– किल्ले तिकोणा गडावर यंदाही जल्लोषात साजरी होणार श्रीराम नवमी । Tikona Fort
– मोरया प्रतिष्ठानची ‘सफर गड दुर्गांची’ पाचवी मोहिम किल्ले तिकोणा गडावर, 90 बालकांचा सहभाग । Vadgaon Maval

– आमदार सुनिल शेळके आणि खानदेश युवा मंचच्या पाठपुराव्याला यश; तळेगाव ते चोपडा नियमित बससेवा सुरु

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

‘समोरच्या उमेदवाराचे किती आव्हान असेल?’ श्रीरंग बारणे म्हणाले, ‘समोर कोण उमेदवार आहे माहिती नाही…’

Next Post

शाब्बास…! एकविरा विद्या मंदिर शाळेचे 5 विद्यार्थी एन.एम.एम.एस. परीक्षा गुणवत्ता यादीत चमकले । Karla News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Ekvira Vidya Mandir School Karla

शाब्बास...! एकविरा विद्या मंदिर शाळेचे 5 विद्यार्थी एन.एम.एम.एस. परीक्षा गुणवत्ता यादीत चमकले । Karla News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
Demand to reroute power line obstructingthe paragliding hill in Kamshet Maval

कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिलला अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गात बदल करण्याची मागणी

June 25, 2026
Ashadhi-Wari

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

June 24, 2026
MLA Sunil Shelke

पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव

June 24, 2026
Rain begins in the Pavana Dam area paddy seedlings get new lease of life bringing relief to farmers

Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला

June 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.