Dainik Maval News : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत मावळ तालुक्यातील कार्ला-खडकाळा हा गट अत्यंत महत्त्वाचा ठरत असून हा गट पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. याच अनुषंगाने पक्षाने या गटात विकासाभिमुख, लोकविश्वासाचे नेतृत्व आणि ठोस कामगिरी असलेल्या दीपालीताई दीपकआण्णा हुलावळे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे.
माजी पंचायत समिती सदस्य दीपक हुलावळे यांच्या पत्नी, कार्ला ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच, तसेच पीएमआरडीएच्या माजी सदस्या असलेल्या दीपालीताई हुलावळे यांची उमेदवारी मावळचे आमदार सुनील शेळके आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत घोषीत करण्यात आली आहे.
दीपाली हुलावळे यांनी कार्ला ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या कार्यकाळात पारदर्शक, लोकाभिमुख व परिणामकारक प्रशासनाचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या नेतृत्वाखाली रस्ते विकास, पाणीपुरवठा योजना, समाज मंदिरांची उभारणी, अंतर्गत सुविधा, महिला सक्षमीकरण तसेच शेतकरी हिताच्या विविध विकासकामांना मोठी गती मिळाली. त्यांच्या कार्यामुळे कार्ला परिसरात विकासाचा ठळक ठसा उमटला आहे.
स्वच्छ चारित्र्य, ठाम नेतृत्व आणि थेट जनसंपर्क हीच दीपालीताई हुलावळे यांची ओळख आहे. शेतकरी, महिला, युवक, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्या नेहमीच अग्रभागी राहिल्या असून, त्या केवळ नेत्या नसून सामान्य जनतेच्या विश्वासाचा चेहरा म्हणून ओळखल्या जातात.
कार्ला–खडकाळा जिल्हा परिषद गटासाठी दीपालीताई हुलावळे यांनाच उमेदवारी मिळावी, अशी एकमुखी व जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्व गावांतील नागरिकांकडून सातत्याने होत होती. पंचायत समिती उमेदवार, महिला आघाडी, युवक काँग्रेस आणि स्थानिक नेतृत्वानेही त्यांच्या नावावर ठाम भूमिका घेतली होती. अखेर पक्षाने जनभावनेला मान देत त्यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.
मागील तीन ते चार महिन्यांपासून दीपाली हुलावळे या संपूर्ण जिल्हा परिषद गटात घरोघरी भेटी देत नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. मागील कार्यकाळातील ठोस विकासकामे, प्रामाणिक नेतृत्व आणि भविष्यासाठी स्पष्ट विकासदृष्टी यामुळे त्यांना सर्व स्तरांतून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. कार्ला–खडकाळा मतदारसंघाचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे दीपालीताई हुलावळे यांनी दैनिक मावळ सोबत बोलताना स्पष्ट केले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– कार्ला-खडकाळा गटाच्या विकासासाठी आशाताई वायकर यांचे गणरायाला साकडे !
– राष्ट्रवादीने इंदुरी-वराळे गटात फोडला प्रचाराचा नारळ ! नवलाख उंबरे गावात प्रचार रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
– ‘…त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलंच नाही’ ; मावळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आमने – सामने
– निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळात पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर ; जागोजागी होतेय वाहनांची तपासणी