पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक लढवण्यासाठी महाविकासआघाडी सज्ज झाली आहे. भारतीय जनता पार्टीने त्यांचे अधिकृत उमेदवार घोषित केल्यानंतर आता मविआनेही दोन्ही जागांबाबत आपली भुमिका स्पष्ट केली आहे. खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत ट्वीट केले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कसबा काँग्रेसकडे आणि चिंचवड राष्ट्रवादी लढवणार…
शनिवारी (4 फेब्रुवारी) भारतीय जनता पार्टीने दोन्ही ठिकाणचे अधिकृत उमेदवार जाहीर केले. त्यानंतर आज दिवसभर अनेक राजकीय नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आग्रही भुमिका मांडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही अशीच भुमिका मांडली. अशात आता महाविकासआघाडी कोणता निर्णय घेणार, निवडणूक बिनविरोध होणार का, याबद्दल चर्चा सुरु असतानाच काँग्रेस नेते नाना पटोले यांनी एक ट्विट करुन मविआची दिशा स्पष्ट केली आहे. ज्यानुसार ही निवडणूक होणार असून मविआ दोन्ही ठिकाणी लढणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. ( Kasba Assembly by-election Congress and Chinchwad Assembly by-election NCP will contest Nana Patole Tweet )
पुणे जिल्ह्यातील चिंचवड व कसबा मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत.
कसबा मतदारसंघाची जागा कॉंग्रेस पक्ष आणि चिंचवड मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला आहे.
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 5, 2023
पुणे जिल्ह्यातील चिंचवड व कसबा मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत.
कसबा मतदारसंघाची जागा कॉंग्रेस पक्ष आणि चिंचवड मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला आहे
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) February 5, 2023
“पुणे जिल्ह्यातील चिंचवड व कसबा मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत. कसबा मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्ष आणि चिंचवड मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला आहे,” असे ट्विट नाना पटोले यांनी केले आहे. मात्र, अद्याप अधिकृत उमेदवार घोषित करण्यात आले नाहीत.
भाजपाकडून दोन्ही जागचे उमेदवार जाहीर…
भाजपाकडून कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक साठी हेमंत नारायण रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी श्रीमती अश्विनी लक्ष्मण जगताप यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक समितीने ही नावे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली आहे.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणूक, भाजपाकडून उमेदवारांची नावे जाहीर, ‘यांना’ मिळाली उमेदवारी
– कसबा विधानसभा पोटनिवडणूक भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना महायुती पूर्ण ताकदीने लढणार, उमेदवार ठरला?