मावळ तालुक्यातील बहुचर्चित काले विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालक पदी कविता विजय कालेकर आणि नामदेव अर्जुन कालेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. रिक्त झालेल्या दोन संचालक मंडळाच्या पदासाठी बुधवारी (दिनांक 13 डिंसेबर) रोजी निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत सर्वसाधारण कर्जदार सभासद कविता विजय कालेकर आणि नामदेव अर्जुन कालेकर यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. ह्यावेळी निवडणूक अधिकारी राकेश निखारे यांनी दोन अर्ज आल्याने दोन संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
निवडीनंतर गुलालाची उधळण करत संचालकांनी एकमेकांना पेढा भरवून आंनदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी निवडणूक अधिकारी आर. के. निखारे आणि सचिव धनंजय कालेकर, सहसचिव पांडुरंग गावडे यांनी काम पाहिले. तसेच, चेअरमन चिंधु गजानन कालेकर, लक्ष्मण भालेराव, अंकुश शेडगे, बाळु दुदांजी कालेकर, ज्ञानेश्वर आढाव, दत्तात्रय विठ्ठल कालेकर, सुनिता कालेकर, सरपंच खंडू कालेकर, भाऊ ठाकर, हिरामण आढाव, बबन कालेकर, जितेंद्र कुडे, बाळु गोपाळ कालेकर, दत्ता किसन कालेकर, दिपक रणपिसे, देवानंद भालेराव, अनिल भालेराव, बाळु पवार यांच्यासह सर्व संचालक उपस्थितीत होते. ( Kavita Kalekar and Namdev Kalekar elected unopposed directors of Kale Society Pavananagar Maval )
अधिक वाचा –
– ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन, मराठी सिनेसृष्टीवर शोककळा । Actor Ravindra Berde Passed Away
– तिकोणा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उषा सुतार बिनविरोध । Gram Panchayat Election
– मोठी बातमी! रोहित पवार पोलिसांच्या ताब्यात? नागपूरमध्ये मोठा राडा – पाहा Live व्हिडिओ