राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामशेत शहर यांच्या वतीने कामशेत शहरात खेळ रंगला पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मावळचे आमदार सुनिल शेळके यांचा दिनांक 20 ऑक्टोबर रोजी वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला महिला वर्गाचा उदंड प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. ( Khel Rangla Paithanicha Home Minister Competition by NCP Kamshet Occasion of Maval MLA Sunil Shelke Birthday )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पैठणी साडीसह, दुचाकी, फ्रीज, दागिना सेट आदी महागडी बक्षिसे यामुळे महिला वर्ग मोठ्या प्रमाणात यात सहभागी झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामशेत शहरच्या वतीने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम सफल करण्यात आला. तसेच यावेळी आमदार सुनिल शेळके यांचा हजारो नागरिकांच्या उपस्थितीत सन्मान करुन वाढदिवसाचा केक देखील कापण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार शेळके सपत्निक उपस्थित होते.
अधिक वाचा –
– श्रीक्षेत्र देहू येथे किल्ले बनवा स्पर्धेला उदंड प्रतिसाद, आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते बक्षिस वाटप
– Video : मावळ तालुक्यात भात कापणीला वेग, शेतकऱ्यांकडून यंत्राद्वारे भात कापणीस प्राधान्य