Dainik Maval News : गाडीला कट का मारला, असा जाब विचारत एका तृतीयपंथी व्यक्तीने तिच्या साथीदारांसोबत मिळून दोन तरुणांना बेदम मारहाण केली. तसेच एका तरुणाच्या डोक्यात बियरची बाटली फोडली. ही घटना गुरुवारी (दि.१६) पहाटे दीड वाजता वरसोली टोल नाका येथे घडली.
सुमित रवींद्र कदम (वय २२, रा. कुसगाव बुद्रुक, मावळ) यांनी याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तृतीयपंथी सागर इंगोले आणि तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र ओंकार हे कार मधून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून जात होते. वरसोली टोलनाका येथे आल्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांची गाडी अडवली. सुरुवातीला ओंकार याला शिवीगाळ, दमदाटी केली.
भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी गेले असता त्यांना देखील मारहाण करून त्यांच्या डोक्यात बियरची बाटली फोडून जखमी केले. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– येत्या तीन ते चार महिन्यांत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिकेच्या निवडणुका होणार !
– बाजार समितीवर कुणाची सत्ता राहणार ? मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीची नव्याने निवड होणार
– राष्ट्रवादीने रणशिंग फुंकले ! पक्षाची कोअर कमिटी जाहीर , आमदार सुनील शेळके यांचा समावेश । Maval News