वडगाव मावळ शहराचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर देवस्थान संस्थानच्या मुख्य विश्वस्त पदी किरण शंकरराव भिलारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. आज (दि. 26 मे) रोजी झालेल्या सर्व विश्वस्तांच्या सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पोटोबा महाराज देवस्थान संस्थानचे मुख्य विश्वस्त दिवंगत सोपानराव उर्फ आण्णा म्हाळसकर यांचे मागील महिन्यात दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे देवस्थानचे हे प्रमुख पद रिक्त होते. सोपान म्हाळसकर यांच्या नंतर देवस्थान संस्थानचे काम त्याच विश्वासाने आणि समर्थपणे चालवण्यासाठी किरण भिलारे यांच्या नावावर आज सर्वांनी सहमती दर्शवली. ( Kiran Bhilare Elected as Chief Trustee of Shri Potoba Maharaj Devasthan Vadgaon Maval )
किरण भिलारे हे वडगाव मावळ शहरातील विविध सामाजिक संघटनांचे सदस्य असून पोटोबा देवस्थानचे विश्वस्त म्हणून ते अनेक वर्षे कामकाज पाहत आहेत. त्यांच्या निवडीनंतर पोटोबा महाराज मंदिरात त्यांचा सन्मान करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सर्व विश्वस्त मंडळ आणि वडगाव शहरातील अनेक मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी ! बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीचे 27 मे पासून अर्ज भरता येणार, वाचा अधिक
– अपेक्षित हुंडा न मिळाल्याने सासरच्यांनी केला छळ, त्रासाला कंटाळून नवविवाहितेची आत्म’हत्या, मावळमधील धक्कादायक प्रकार!
– गाव करी ते राव काय करी ! कुसगाव ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या पवित्र्याने प्रशासनाची धावपळ, 10 जूनपर्यंत योजना पूर्ण करण्याचे आश्वासन