व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, October 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘किशोरभाऊंच्या खुनाची पसरवलेली 5 कारणे म्हणजे मुद्दाम पसरवलेले राजकारण’, वाचा सविस्तर

स्वर्गीय किशोर आवारे यांच्या बाबतीत त्यांच्या मृत्यूनंतर देखील गैरसमज पसरवून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत ते थांबवण्याचे आवाहन मिलिंद अच्युत यांनी केले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 18, 2023
in पुणे, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Kishor-Aware

Photo Courtesy : Dainik Maval Graphics Team


जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय किशोर आवारे यांच्या खुनामागील सांगितली जाणारी पाच कारणे म्हणजे मुद्दामून पसरवलेले राजकारण आहे, तसेच अशा बातम्या पेरून एखाद्या व्यक्तीच्या मनात राग निर्माण करणे हे खुनाच्या कटात सामील होण्या इतकेच गंभीर आहे. स्वर्गीय किशोर आवारे यांच्या बाबतीत त्यांच्या मृत्यूनंतर देखील गैरसमज पसरवून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत ते थांबवण्याचे आवाहन मिलिंद अच्युत यांनी केले आहे. ( Kishor Aware Murder Case Five Reasons Spread About Murder Are Wrong Said Yogesh Parge )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

1) आरोपींच्या जमिनीचा ताबा – स्वर्गीय किशोर आवारे यांनी आरोपींच्या जमिनीचा ताबा घेतल्यामुळे सदर प्रकार घडला असल्याची चर्चा रंगवण्यात येत आहे. परंतु किशोर आवारे यांनी कुठल्याच जमिनीचा ताबा घेतलेला नाही. जर याबाबत माहिती खरी असेल तर तळेगाव पोलीस स्टेशन येथे त्याबाबत अर्ज करण्याची विनंती योगेश पारगे यांनी केली आहे असा कुठलाही ताबा किशोर आवारे यांनी घेतला नाही व त्याची त्यांना उभ्या आयुष्यात गरजही लागली नाही, त्यामुळे सदर माहिती खोटी असून आप-प्रचार करणारी आहे.

2) बांधकाम साईट बंद केल्याचे प्रकरण – किशोर आवारे यांनी स्वतः बांधकाम साईट बंद केली असा अपप्रचार करण्यात येत आहे. तरी किशोर आवारे यांनी कुणाचीही बांधकाम साईट बंद केलेली नाही, पोलीस तपासात देखील तसे निष्पन्न झालेले मला तरी आढळून आले नाही, जर हा प्रकार खरा असेल तर तळेगाव पोलीस स्टेशन येथे अर्ज करावा त्यामुळे सत्यता काय आहे हे किशोर भाऊ आवारे यांच्या नंतर तरी समाजाला कळेल.

3) वृक्षतोडीचे प्रकरण – कृष्णा आकार सोसायटी मागील ओढ्या लगत असणाऱ्या ग्रीन झोन बेल्ट मधील काही वृक्ष नगर परिषदेच्या माध्यमातून तोडण्यात येत असल्याची लिखित तक्रार सामाजिक कार्यकर्ते सचिन देशपांडे यांनी नगर परिषदेमध्ये केली होती त्याची शहानिशा करण्यासाठी जनसेवा विकास समितीचे कार्यकर्ते काही पत्रकारांच्या माध्यमातून व किशोर भाऊ यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी भेट देऊन आले होते. सदर प्रकरणात तत्कालीन मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या संदर्भातील तक्रार अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आला होता. त्याबद्दल लिखित तक्रार किशोर आवारे यांनी केलेली नाही, तसेच किशोर आवारे यांना नगरपरिषदेमध्ये सुनावणीसाठी सुद्धा कधीही बोलावलेले नाही त्यामुळे सदर पेरलेली बातमी धाधांत खोटी आहे.

हेही वाचा – किशोर आवारे हत्या प्रकरण : आरोपी भानू खळदे याची येरवडा कारागृहात रवानगी, वाचा सविस्तर । Kishor Aware Murder Case

4) टोलनाक्यामुळे घडलेला वाद – किशोर आवारे यांनी सोमाटणे टोलनाका बंद व्हावा यासाठी जन आंदोलन पुकारलेले होते. सोमाटणे येथील टोलनाका मावळकर नागरिकांना मोफत व्हावा, एवढाच त्यातील हेतू होता. सोमटणे टोल नाका येथील जागा बदलण्यात यावी यासाठी किशोर आवारे प्रयत्न करत होते कारण सध्याची जागा ही अत्यंत दाट वस्तीची असल्यामुळे वाहतुकीच्या कोंडीची समस्या तळेगावकर नागरिकांना भेडसावत होती. त्यामागील प्रामाणिक हेतू हा अगदी स्पष्ट होता. अनेक रुग्णांना या वाहतुकीच्या समस्येमुळे प्राण गमवावे लागले ही वस्तुस्थिती आहे .टोल नाका इतर ठिकाणी हलवावा एवढीच मागणी स्वर्गीय किशोर आवारे यांच्याकडून करण्यात आली होती त्यामुळे त्या ठिकाणी सुरू असणारे कुणाचे कॉन्ट्रॅक्ट काढून घ्यावे किंवा कुणालाही आर्थिक झळ पोहचवावी अशी किशोर आवारे यांची कधीही इच्छा नव्हती, कुणाच्याही कॉन्ट्रॅक्ट मध्ये हस्तक्षेप टोल नाक्या संदर्भात किशोर आवारे यांनी केलेला नाही. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टच्या आड येणं ही सुद्धा बातमी खोटी आहे त्यामुळेच संबंधितांच्या डोक्यात राग उत्पन्न झाला असावा असं स्पष्ट अंदाज आहे, त्यामुळे सदर बातमी मुद्दामहून पसरवण्यात आलेली आहे हे स्पष्ट होत आहे.

5) खाऊ गल्ली बंद करण्यासाठी प्रयत्नशील – खाऊ गल्ली बंद करण्यासाठी स्वर्गीय किशोर आवारे प्रयत्न करत आहेत ही बाब खोटी आहे. किशोर भाऊ यांनी उभ्या आयुष्यात खाऊ गल्लीकडे ढुंकूनही पाहिलेले नाही, कुणाचा व्यवसाय बंद पडावा असे किशोर आवारे यांना कधीच वाटलेले नाही, तसा त्यांनी प्रयत्न देखील केलेला नाही, एवढ्या शूद्र मनोवृत्तीचे किशोर आवारे कधीच नव्हते, त्यामुळे सदर पेरलेले कारण हे धादांत खोटे आहे व दिशाभूल करणारे आहे.

सदर सर्व कारणे अत्यंत शुल्लक व चर्चेअंती मिटणारी होती त्यासाठी एवढ्या टोकाची भूमिका घेणे योग्य नसल्याचे पारगे यांनी व्यक्त केले आहे. आज शुल्लक रागामुळे दोन कुटुंब उध्वस्त झालेली आहेत, तरुण रागाच्या भरात आपल्या आयुष्यातील ध्येय विसरून बसलेले आहेत, त्यामुळे स्वतःच्या रागावर नियंत्रण असणे खूपच गरजेचे आहे व अपप्रचाराला बळी न जाता चर्चेने मार्ग निघू शकतात असे मिलिंद अच्युत यांनी नमूद केले आहे. ( Kishor Aware Murder Case Five Reasons Spread About Murder Are Wrong Said Yogesh Parge )

स्वर्गीय किशोर आवारे जनसेवक होते, त्यांच्या कार्याची प्रचिती गगनाला भिडलेली होती, त्यामुळे राजकीय प्रतिमा मलिन व्हावी हाच त्यामागील दृष्टिकोन असावा असा अंदाज मिलिंद अच्युत यांनी व्यक्त केला आहे. अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवून एखाद्याच्या मनात राग उत्पन्न होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळेच स्वर्गीय किशोर आवारे यांच्या बाबतीत घात झाला असावा असा अंदाज मिलिंद अच्युत यांनी व्यक्त केला आहे.

अधिक वाचा –
– पवनामाई फेसाळली, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ; संबंधितांवर कठोर कारवाईची खासदार बारणेंची मागणी
– पुणे ग्रामीण पोलिस दलात मोठे फेरबदल; अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या, मावळमध्येही ‘या’ पोलिस ठाण्यात नवीन अधिकारी


dainik maval jahirat

Previous Post

टाकवे बुद्रुकमधील न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल 27 वर्षांनी अनुभवले शाळेतील “ते” दिवस…

Next Post

तळेगाव स्टेशन युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी समीर दाभाडे यांची निवड । Maval Politics News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
maval-taluka-congress

तळेगाव स्टेशन युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी समीर दाभाडे यांची निवड । Maval Politics News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Distribution of books to students on occasion of birth anniversary of late Pandharinath Satkar kanhe maval

स्व. पंढरीनाथ हरिभाऊ सातकर यांच्या जयंतीनिमित्त १५० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पुस्तकसंचांचे वाटप

October 28, 2026
Successful follow-up by Bala Bhegade government takes positive step toward declaring Maval drought-affected taluka

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा यशस्वी पाठपुरावा; मावळ दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर होण्याच्या दिशेने शासनाचे सकारात्मक पाऊल

October 27, 2026
Ravindra Bhegade met with CM devendra fadanvis to request an early meeting regarding Pavana farmer

पवना धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर लवकर बैठक घेण्याबाबत रवींद्र भेगडे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

October 27, 2026
Prize distribution ceremony for Late Suryakant Kaka Walunj Memorial Drawing Competition talegaon dabhade

सात हजार विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा गौरव! कै. सूर्यकांत काका वाळुंज स्मृती चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

October 26, 2026
Document registration Dast Nondani

सामायिक सातबारा असलेल्या जमिनींच्या विक्रीसाठी राज्यात नवा नियम; यापुढे ‘ही’ कागदपत्रे नसल्यास दस्त नोंदणी होणार नाही

October 25, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे – लोणावळा लोकल प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! रविवारी रेल्वे ब्लॉक, लोकलच्या फेऱ्या रद्द, एक्सप्रेसच्या वेळांत बदल

October 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.