महाविकास आघाडीचे कोकण शिक्षक मतदार संघातील बाळाराम पाटील यांच्या प्रचारार्थ शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी खोपोली शहरातील शिक्षक मतदारांशी संवाद साधून बाळाराम पाटील यांना बहुमताने निवडून देण्यासाठी मतदान करावे, असे आवाहन केले आहे. ( Konkan Teachers Constituency Election Shetkari Kamgar Paksh Jayant Patil Campaigned For Balaram Patil )
खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, वसंत देशमुख मेमोरियल ट्रस्ट तसेच खोपोली शहरातील विविध शाळांतील शिक्षक मतदारांशी संवाद साधून बाळाराम पाटील हे मागील कार्यकाळात शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी ज्या आक्रमकतेने महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभागृहात आवाज उठवत होते, याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार असल्याचे सांगत अत्यंत अभ्यासु, संवेदनशील आणि शिक्षकांच्या सर्वांगीण प्रश्नांची जाण असलेला उमेदवार म्हणून त्यांचेकडे पाहीले पाहिजे असे सांगत शैक्षणिक साहित्य पुरवण्यात देखील भरीव कार्य केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
भिडे वाड्यापासून मंत्रालय मुंबई पर्यंत पदयात्रेच्या माध्यमातून शिक्षकांच्या प्रश्नासाठी त्यांनी केलेले प्रयत्न सर्वांच्या लक्षात राहतील असेच आहेत. अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांच्या वाढत जाणाऱ्या अडचणींच्या सोडवणुकीसाठी बाळाराम पाटील हे पर्याय ठरतील, असा विश्वास आमदार जयंत पाटील यांनी बोलून दाखवला.
शिक्षण क्षेत्रातील मान्यवर समजले जाणाऱ्या दत्तात्रय मसुरकर, उल्हास देशमुख, महाविकास आघाडी मधील राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे मनेष यादव, मंगेश दळवी, कुलदीपक शेंडे, रमेश जाधव, शेकापचे संदीप पाटील, शाम कांबळे,अविनाश तावडे, कैलास गायकवाड, रवी रोकडे, जयंत पाठक, शांताराम पाटील यांची देखील त्यांनी भेट घेऊन बाळाराम पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. ( Shetkari Kamgar Paksh Jayant Patil Campaigned For Maha Vikas Aghadi Konkan Teachers Constituency Election Candidate Balaram Patil )
खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, कार्यवाह किशोर पाटील, सदस्य राजेश आभानी, दिनेश गुरव, वसंत देशमुख मेमोरियल स्कूलचे विक्रांत देशमुख हे देखील या दौऱ्यात सहभागी झाले होते. प्रा. प्रताप पाटील, प्रा. प्रशांत माने पुरोगामी शिक्षक संघटनेचे जयंत पाटील, जितेंद्र देशमुख, राजेंद्र कुंभार, दत्तात्रय गव्हाणे, काशिनाथ गोरे, हेमंत खाडे, जगदीश मरागजे आणि शिक्षक वर्गासोबत आमदार जयंत पाटील यांनी प्रत्यक्ष चर्चा केली.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडून कोणताही निकाल नाही, शिंदे-ठाकरे गटाला लेखी उत्तर देण्याची सुचना, ‘या’ तारखेला पुढील सुनावणी
– मिंडेवाडीतील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्या आणि नूतन अंगणवाडीचे आमदार शेळकेंच्या हस्ते उद्घाटन