व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, May 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महाविकास आघाडीच्या बाळाराम पाटलांच्या समर्थनार्थ शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील मैदानात

भिडे वाड्यापासून मंत्रालय मुंबई पर्यंत पदयात्रेच्या माध्यमातून शिक्षकांच्या प्रश्नासाठी बाळाराम पाटलांनी केलेले प्रयत्न सर्वांच्या लक्षात राहतील असेच आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 21, 2023
in महाराष्ट्र
Jayant-Patil-Campaigned-For-Balaram-Patil

Photo : Gurunath Sathilkar


महाविकास आघाडीचे कोकण शिक्षक मतदार संघातील बाळाराम पाटील यांच्या प्रचारार्थ शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी खोपोली शहरातील शिक्षक मतदारांशी संवाद साधून बाळाराम पाटील यांना बहुमताने निवडून देण्यासाठी मतदान करावे, असे आवाहन केले आहे. ( Konkan Teachers Constituency Election Shetkari Kamgar Paksh Jayant Patil Campaigned For Balaram Patil )

खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, वसंत देशमुख मेमोरियल ट्रस्ट तसेच खोपोली शहरातील विविध शाळांतील शिक्षक मतदारांशी संवाद साधून बाळाराम पाटील हे मागील कार्यकाळात शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी ज्या आक्रमकतेने महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभागृहात आवाज उठवत होते, याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार असल्याचे सांगत अत्यंत अभ्यासु, संवेदनशील आणि शिक्षकांच्या सर्वांगीण प्रश्नांची जाण असलेला उमेदवार म्हणून त्यांचेकडे पाहीले पाहिजे असे सांगत शैक्षणिक साहित्य पुरवण्यात देखील भरीव कार्य केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

भिडे वाड्यापासून मंत्रालय मुंबई पर्यंत पदयात्रेच्या माध्यमातून शिक्षकांच्या प्रश्नासाठी त्यांनी केलेले प्रयत्न सर्वांच्या लक्षात राहतील असेच आहेत. अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांच्या वाढत जाणाऱ्या अडचणींच्या सोडवणुकीसाठी बाळाराम पाटील हे पर्याय ठरतील, असा विश्वास आमदार जयंत पाटील यांनी बोलून दाखवला.

शिक्षण क्षेत्रातील मान्यवर समजले जाणाऱ्या दत्तात्रय मसुरकर, उल्हास देशमुख, महाविकास आघाडी मधील राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे मनेष यादव, मंगेश दळवी, कुलदीपक शेंडे, रमेश जाधव, शेकापचे संदीप पाटील, शाम कांबळे,अविनाश तावडे, कैलास गायकवाड, रवी रोकडे, जयंत पाठक, शांताराम पाटील यांची देखील त्यांनी भेट घेऊन बाळाराम पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. ( Shetkari Kamgar Paksh Jayant Patil Campaigned For Maha Vikas Aghadi Konkan Teachers Constituency Election Candidate Balaram Patil )

खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, कार्यवाह किशोर पाटील, सदस्य राजेश आभानी, दिनेश गुरव, वसंत देशमुख मेमोरियल स्कूलचे विक्रांत देशमुख हे देखील या दौऱ्यात सहभागी झाले होते. प्रा. प्रताप पाटील, प्रा. प्रशांत माने पुरोगामी शिक्षक संघटनेचे जयंत पाटील, जितेंद्र देशमुख, राजेंद्र कुंभार, दत्तात्रय गव्हाणे, काशिनाथ गोरे, हेमंत खाडे, जगदीश मरागजे आणि शिक्षक वर्गासोबत आमदार जयंत पाटील यांनी प्रत्यक्ष चर्चा केली.

अधिक वाचा –

– मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडून कोणताही निकाल नाही, शिंदे-ठाकरे गटाला लेखी उत्तर देण्याची सुचना, ‘या’ तारखेला पुढील सुनावणी
– मिंडेवाडीतील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्या आणि नूतन अंगणवाडीचे आमदार शेळकेंच्या हस्ते उद्घाटन


Previous Post

मिंडेवाडीतील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्या आणि नूतन अंगणवाडीचे आमदार शेळकेंच्या हस्ते उद्घाटन

Next Post

धक्कादायक! बेपत्ता महिलेचा मृतदेह विहिरीत आढळला, लोणावळाजवळील देवघर येथील घटना

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Woman-Dead-Body-Found-In-Well

धक्कादायक! बेपत्ता महिलेचा मृतदेह विहिरीत आढळला, लोणावळाजवळील देवघर येथील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

house of widow Shalan Dahibhate in Bedse Maval was gutted in fire caused by short circuit

एक वर्षापूर्वी पतीचे निधन, आता आगीत घर जळून खाक ; बेडसे गावातील शालन दहिभाते यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर

May 20, 2026
Prostitution business on old Pune-Mumbai highway Many dens in Talegaon Vadgaon Dehu Road Somatane

पुणे-मुंबई महामार्गालगत वेश्या व्यवसाय तेजीत ! तळेगाव, वडगाव, देहूरोड, सोमाटणे हद्दीत अनेक अड्डे ; पोलिसांचे पाहूनही दुर्लक्ष

May 20, 2026
ECI Central Election Commission

मोठी बातमी ! पुणे जिल्ह्याची स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक जाहीर ; आचारसंहिता लागू

May 19, 2026
fadnvis shinde pawar

महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटींच्या कामांना मान्यता

May 19, 2026
Pune District Collector Jitendra Dudi

पुणे जिल्ह्यात धरणे व तलावांमधील गाळ काढण्याच्या कामांना गती द्या – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

May 19, 2026
आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

May 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.