भारतीय स्त्री मुक्तीच्या आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज ( 3 जानेवारी ) जयंती होती. मावळ तालुक्यातील इंदोरी येथील चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (CBSE) मध्ये देशातील प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती (3 जानेवारी) उत्साहात साजरी करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देणारे महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाज उद्धाराचा आणि स्त्री शिक्षणाचा वसा त्यांच्या पत्नी क्रांतिज्योती सावित्री माई फुले यांनी तितक्याच जोमाने पुढे नेला. त्यामुळेच आज तळागाळातील महिला-मुली या शिक्षित झाल्याचे आपण पाहू शकतोय. म्हणूनच चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये दरवर्षी सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते. ( Kranti Jyoti Savitribai Phule Jayanti Celebrated at Chaitanya International School Indori Maval )
आजही सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रार्थना सभेत सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल माहिती दिली. एका विद्यार्थिनीने यावेळी सावित्रीबाई फुले यांच्यासारखा वेष परिधान केला होता. शाळेचे हिंदी विभागाध्यक्ष अमोल धिमधिमे यांनी सावित्रीबाईंचा संपूर्ण जीवनप्रवास सविस्तरपणे सांगितला. अन्य अध्यापकांनीही आपले मत मांडले. अखेरीस सर्व विद्यार्थी आणि अध्यापकांनी सावित्रीमाईंना दंडवत करत त्यांना अभिवादन केले.
अधिक वाचा –
– पवनानगर येथील संकल्प इंग्लिश स्कूलमध्ये ‘बालिका दिन’ उत्साहात साजरा । Pavananagar
– बापरे बाप! लोणावळा उपविभागात तब्बल 510 वाहन चालकांवर कारवाई, 3 लाख 61 हजारांचा दंड वसूल । Lonavala News
– मराठा समाजाचे शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्व्हेक्षणाचे काम बिनचूक व्हावे – मुख्यमंत्री । Maratha Reservation