महाराष्ट्र शासन कृषि विभाग तालुका कृषि अधिकारी मावळ व मंडळ कृषि अधिकारी काळेकॉलनी यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे महागाव येथे मंडळस्तरीय भात लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण कृषि संजीवनी मोहीम अंतर्गत घेण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रभारी मंडळ कृषि अधिकारी, काळेकॉलनी नागनाथ शिंदे यांनी, कृषिसहाय्यक विकास गोसावी यांनी मार्गदर्शन केले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महागाव येथे घेण्यात आलेल्या कृषि संजीवनी मोहीम अंतर्गत मंडळ कृषि अधिकारी काळेकॉलनी नागनाथ शिंदे यांनी भात लागवड तंत्रज्ञान सविस्तर मार्गदर्शन केले. कृषि सहाय्यक विकास गोसावी यांनी पी. एम. किसान योजना ई-केवायसी, आधारकार्ड बॅंक खात्याला जोडणे किंवा पोस्टात नवीन खाते उघडणे, कृषि खात्याच्या योजना बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ( Krishi sanjivani Mission Training Program Held At Mahagaon Village Maval Taluka )
पवनमावळात दरवर्षी पाऊस चांगला पडतो. सद्या स्थितीला पाऊस चालू झाला असल्याने शेतकरी सुखवाला आहे.पवनमावळ भागात भात पिकांसाठी पोषक वातावरण असून येथील शेतकरी हे प्रयोगशील आहेत. शेतकरी चारसूत्री, एस. आर. टी. यांत्रिक पद्धतीने भात लागवड करतात. यावर्षी ही मोठ्या प्रमाणात चारसूत्री लागवड करणार असल्याचे कृषि मित्र पांडुरंग पडवळ यांनी सांगितले.
महागाव येथील कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी भिकू तिकोने, श्रीरंग घारे, रमेश गायकवाड, दामू बैकर, विकास निकम, धारू मरगळे, दत्तात्रय तिकोने, रोहीत जाधव, धोंडिबा घारे, कृष्णा तिकोने, आशा पडवळ, कलाबाई भालेसाईन, रामदास जाधव, दत्तात्रय जाधव, बायडाबाई तिकोने, ताराबाई तिकोने, सीमा तिकोणे, ताराबाई तिकोने, सीमा तिकोने, दत्तात्रय निकम, अंकुश साबळे, रघुनाथ तिकोने, सागर धुमाळ, गबळू पडवळ हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन कृषि सहाय्यक विकास गोसावी व कृषिमित्र पांडुरंग पडवळ यांनी केले.
“शेतकऱ्यांनी भात उत्पादन वाढीसाठी चारसूत्री पद्धतीने दोरीत लागवड, युरिया ब्रिकेट वापर करावा. मग्रारोहयो फळबाग लागवड योजनेचा लाभ घ्यावा. पी.एम. किसान सन्मान योजना ई-केवायसी करणे व बॅंक खात्याला आधारकार्ड जोडणे किंवा पोस्टात खाते उघडावे.” – विकास गोसावी (कृषि सहाय्यक काले – महागाव)
अधिक वाचा –
– एकच नंबर..! आपल्या मावळातील गहुंजे स्टेडियमवर होणार क्रिकेट वर्ल्डकपचे 5 सामने, पहिला सामना भारताचा, बघा वेळापत्रक
– अबब..!! कामशेतमध्ये आढळला तब्बल 8 फूटी अजगर, वन्यजीव रक्षक मावळच्या शिलेदारांकडून जीवदान