Dainik Maval News : पाण्याच्या जॅकवेलचे काम करीत असताना पाय घसरुन विहिरीत पडल्याने एका मजुराचा बुडून मृत्यू झाला. मावळ तालुक्यातील वराळे गावात शनिवारी (दि.16) ही घटना घडली. नितीश कुमार सिंह (वय 19, मूळ रा. बिहार, सध्या रा. वराळे ता. मावळ) असे मृत तरूणाचे नाव आहे.
तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, वराळे गावात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत पाण्याच्या जॅकवेलचे काम एक कंपनी करत असून नितीश कुमार सिंग हा तिथे कामावर होता. सकाळी नऊच्या सुमारास तो खाली उतरत असताना पाय घसरून विहिरीत पडला आणि त्याचा मृत्यू झाला.
वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे गणेश गायकवाड, गणेश सोंडेकर, प्रशांत भालेराव, भास्कर माळी, संकेत मराठे, राजु सय्यद आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस सहकारी यांनी मृतदेह पाण्याबाहेर काढण्याचे काम केले. अधिक तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ विधानसभा : तळेगाव शहरातील आमदार सुनील शेळके यांचा ‘रोड शो’ ठरणार ‘गेम चेंजर’
– मायबाप जनतेने मतदानरुपी आशीर्वाद द्यावेत ; प्रचाराची सांगता करताना आमदार शेळकेंचे भावनिक आवाहन
– ‘बापूसाहेब भेगडे यांचे सक्षम नेतृत्व लाभल्यास मावळ समृद्ध होईल’