Dainik Maval News : राज्याच्या भूमि अभिलेख विभागाने सर्व्हेनंबर निहाय गाव नकाशा ऑनलाइन पध्दतीने उपलब्ध करून दिला आहे. यासुविधेमुळे संबधित गावामध्ये जमीन कुठे आहे, जमिनीच्या चतु:सिमा, आजबाजूचे गटनंबर आणि मालक कोण आहेत, याची माहिती घरबसल्या एका क्लिकवर मिळत आहे.
- भूमि अभिलेख विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना अधिकाधिक सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. ऑनलाइन सातबारा उतारा, आठ अ, फेरफार आदी सुविधांबरोबरच सर्व्हेनंबरनिहाय गावाचा नकाशा महाभूमि या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे.
भूमी अभिलेख विभागाने सातबारा उतारा आणि गाव नकाशा एकमेकांशी लिंक केला आहे. त्यामुळे जमिनीची खरेदी आणि दस्त नोंदणी करण्यापूर्वी ही सर्व माहिती नागरिकांना एका क्लिकवर मिळत आहे. यापूर्वी तलाठी कार्यालयात अथवा तालुक्याच्या भूमि अभिलेख कार्यालयात जाऊन सर्व माहिती घ्यावी लागत होती. आता मात्र ही माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
असा शोधा नकाशा
– सर्व्हेनंबरनुसार गाव नकाशा mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध
– या संकेतस्थळावर गेल्यावर पहिल्यांदा जिल्हा निवडा, तालुका आणि त्यानंतर गाव निवडा
– यानंतर गाव नकाशा हा पर्याय निवडा
– गाव नकाशा उपलब्ध होईल
– संबधित सर्व्हेनंबर टाकल्यावर त्या क्षेत्राचा नकाशा पीडीएफ मध्ये उपलब्ध होईल
– नकाशाची प्रिंट काढता येणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पुणे रिंगरोड’च्या दिशेने पहिले पाऊल ! जमीन मोजणीला प्रारंभ ; जमीनमालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र । Pune Ring Road
– मुंबईला जाण्यासाठी नवा मार्ग विकसित होणार? 135 किलोमीटरचा रस्ता, लोणावळ्याला जायची गरज नाही
– मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune
– मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान