मराठी कलाक्षेत्राला हादरा देणारी बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांचे दुःखद निधन झाले आहे. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तब्बल 60 वर्षांहून अधिक काळ त्यांनी त्यांच्या गायिकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. शनिवारी (10 डिसेंबर) रोजी मुंबईत राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. ( Lavani Singer Sulochana Chavan Passes Away In Mumbai At Age 92 )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांची प्रकृती गेली काही दिवसांपासून खालावली होती. उतारवयामुळे आलेले आजारपण आणि काही शस्त्रक्रिया यामुळे सुलोचना चव्हाण यांची प्रकृती नाजूक बनली होती. अशात शनिवार (10 डिसेंबर) रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल अनेकांकडून शोक व्यक्त केला जात आहे.
सुलोचना चव्हाण यांनी लावणी क्षेत्रात गायनाच्या माध्यमातून स्वतः अढळ स्थाम निर्माण केले. त्यांच्या आवाजातून लावणी ही घराघरात पोहचली. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले. ‘रंगल्या रात्री’ या चित्रपटासाठी त्यांनी पहिली लावणी गायली. ( Lavani Singer Sulochana Chavan Passes Away In Mumbai At Age 92 )
अधिक वाचा –
– प्रवाशांनो, काळजी घ्या! मृत्यू असाही येऊ शकतो… मंगलकार्याला निघाला पण त्याचाच अंत्यविधी झाला !
– स्व. दिगंबर भेगडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वडगावमध्ये रविवारी सर्वपक्षीय शोकसभा