भारताचे प्रधानमंत्री ( Prime Minister of India ) नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्या 72 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कामशेत शहरातील महर्षी कर्वे आश्रम शाळेत ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ विषयावर व्याख्यान आणि एमपीएससी ( MPSC ) युपीएससी ( UPSC ) या स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मावळ कन्या उपजिल्हाधिकारी ( Deputy Collector ) स्वाती दाभाडे ( Swati Dabhade ) आणि उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे ( Sushant Shinde ) (परभणी) हे मान्यवर मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. ( Lecture And Competitive Exam Guidance Session )
हेही वाचा – कोथुर्णेतील निर्भयाचा वाढदिवस; नराधम आरोपीला अजूनही फाशी नाहीच, राजकारण्यांची आश्वासने हवेत
भाजपा विद्यार्थी आघाडी ( आंदर मावळ ) अध्यक्ष विठ्ठल तुर्डे यांच्या वतीने सेवा पंधरवडा निमित्ताने या व्याख्यान आणि मार्गदर्शनपर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, महिला अध्यक्ष सायली बोत्रे, सेवा अभियान संयोजक गणेश ठाकर, विद्यार्थी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत शहरातीत महर्षी कर्वे आश्रम शाळेत हा कार्यक्रम पार पडला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी भाजपा नेते संतोष कुंभार, किसन दाभाडे, सोशल मीडीया अध्यक्ष सागर शिंदे, दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंभोरे, धनगर परिषद अध्यक्ष नामदेव शेडगे कामशेत शहर युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण शिंदे, बबलु सुर्वे, अभिषेक भांगरे आदी शाळेतील शिक्षक वर्ग, विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अखेरीस प्राचार्या देवरे यांनी सर्वांचे आभार मानले. ( Lecture And Competitive Exam Guidance Session On Ek Bharat Shrestha Bharat At Maharishi Karve Ashram School Kamshet )
अधिक वाचा –
कामशेतमध्ये मोठी चोरी, चोरट्यांनी थेट गोदाम फोडले, लाखोंचा मुद्देमाल लंपास
भाजपाच्या लढ्याला यश, अखेर कामशेतमधल्या ‘त्या’ डॉक्टरची बदली