Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात शाश्वत विकास उपक्रमांतर्गत नशामुक्त भारतासाठी व्यसनमुक्तीची शपथ घेण्यात आली. यावेळी विद्यार्थिनींना व्यसनांच्या दुष्परिणामाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. व्यसनांमुळे होणारी शारीरिक हानी तसेच कुटुंबाची वाताहत याबाबत व्याख्यानातून माहिती देण्यात आली.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थिनी आणि प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या प्रा. माधवी शेटे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्य मनीषा लगड होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे एनएसएस विभाग कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. हेमंत मुजळगेकर यांनी केले. ते म्हणाले की, आजच्या आधुनिक काळात शहरीकरण आणि नागरिकीकरण या कारणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागातील व्यसनाच्या अधीन जात आहे आणि स्वतःचे नैतिक मूल्ये,संस्कार, कर्तव्य यांची पायामल्ली करत व्यसन करताना दिसत आहेत.
प्रमुख वक्त्या प्रा. माधवी शेटे यांनी पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब करून तरुण पिढी व्यसन करत असल्याचे सांगितले. तसेच सिने अभिनेता-अभिनेत्री यांना सामोरे जाव्या लागत असलेल्या असाध्य रोगांची ज्वलंत उदाहरणे विद्यार्थिनींना सांगितली. व्यसनापासून कसे लांब रहायचे आणि आपले आरोग्य कसे निरोगी ठेवायचे असे त्यांनी सांगितले. तुम्ही युवा पिढी भारताचे प्रतिनिधित्व करत आहे त्यामुळे दारू, सिगारेट, तंबाखू, ड्रग्स इत्यादी प्रकारच्या व्यसनापासून लांब रहावे, असा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. माधुरी चंदनशिव यांनी केले तसेच आभार प्रा. सौरभ चेचरे यांनी मानले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने पक्ष, नेते, कार्यकर्ते सर्वांसाठीच नियमावली जाहीर ; वाचा नियमावली सविस्तर । Pune News
– कामशेत बोगद्याजवळ टेम्पो उलटून अपघात, एकाचा जागीच मृत्यू
– केटीएसपी मंडळाच्या नव्या विधी महाविद्यालयाची खोपोली शहरात सुरुवात । Khopoli News