व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट येथील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने घेतले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे । Lonavala News

शिबिरात महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट मधील पोलीस अधिकारी आणि अमलदार, महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान आणि खालापूर टोल नाका येथील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 4, 2024
in महाराष्ट्र, लोकल, शहर
Lecture on disaster management

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आपले कर्तव्य बजावत असताना एखादा अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना कशा पद्धतीने मदत करावी, वायु किंवा रसायन गळती झाल्यास कोणत्या उपाययोजना राबवाव्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे कृत्रिम श्वासोश्वास कसा द्यावा या बाबींचे प्रशिक्षण देण्यासाठी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, टाटा स्टील लिमिटेड आणि लाईफ गिअर सेफटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट मधील पोलीस अधिकारी आणि अमलदार, महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान आणि खालापूर टोल नाका येथील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

डॉ. सुरेश कुमार मेकला – अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य, यांचे मार्गदर्शनाखाली मा. तानाजी चिखले – पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस रायगड परिक्षेत्र, मा. घनश्याम पलंगे पोलीस उपअधीक्षक, रायगड विभाग, भरत शेंडगे – पोलीस निरीक्षक, पनवेल विभाग आणि मा. अनिल शिंदे – पोलीस उपनिरीक्षक महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील खालापूर टोल नाक्या जवळ मुंबई बाजूस असलेल्या ट्रक टर्मिनल्स येथील सभागृहात हे शिबिर संपन्न झाले. गुरुनाथ साठेलकर, धनंजय गीध, पंकज बागुल, सौरभ घरत, अमोल कदम आणि हरदिप सिंग यांनी प्रशिक्षकाच्या भूमिकेत सर्वांशी संवाद साधून शंकांचे निरसन करत प्रशिक्षणार्थींकडून प्रात्यक्षिक देखील करवून घेतले. ( Lecture on disaster management to officers and staff of Highway Police Center Borghat )

महामार्ग पोलीस केंद्र बोरघाटचे पोलीस उपनिरीक्षक संजय हेमाडे आणि गजानन म्हात्रे यांनी या शिबिरात सहभागी झालेल्या प्रशिक्षकांचे स्वागत केले तर पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे यांनी सूत्रसंचालकाची भुमिका पार पाडली. अत्याधुनिक उपकरणे आणि हाती असलेल्या संसाधनातून आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी या शिबिरातून जुजबी माहिती आणि मिळालेले प्रशिक्षण स्व संरक्षणासोबत महामार्गावरील इतर घटकांना देखील फायद्याचे ठरेल असे मत प्रशिक्षणार्थींनी व्यक्त आले.

अधिक वाचा –
– ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेतील सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार ; ३१ जुलैनंतरच्या अर्जांची प्रक्रिया सुरू
– खंडाळा तलावात बोटिंग व लोणावळ्यात भूमिगत वीज वाहिन्यांचे काम प्राधान्याने करा – आमदार सुनिल शेळके
– मावळ तालुक्यातील ‘त्या’ तिहेरी हत्याकांड प्रकरणातील पाचव्या आरोपीला अटक । Maval Crime News


Previous Post

‘प्रसाद गोसावी’ अवयवदान करणारा पहिला पत्रकार ! मृत्यूशी झुंज अपयशी पण… अजूनही धडधडतंय हृदय ! Pune News

Next Post

मावळ विधानसभेसाठी भाजपाने कसली कंबर, भाजपाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून गावभेटी सुरू

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
BJP preparation for Maval Vidhan Sabha

मावळ विधानसभेसाठी भाजपाने कसली कंबर, भाजपाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून गावभेटी सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pune Zilla Parishad

Pune ZP Election : ना दौंड, ना इंदापूर.. मावळ तालुक्याला मिळणार जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान ? सुनेत्रा पवार घेणार अंतिम निर्णय

March 17, 2026
Dharmaveer Balidan Mas observed by Shambhu devotees in villages of Maval taluka

मावळ तालुक्यातील गावागावांत शंभूभक्तांकडून ‘धर्मवीर बलिदान मास’चे पालन

March 17, 2026
The equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj was inaugurated in Malwandi Thule

मळवंडी ठुले येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे दिमाखात उद्घाटन

March 17, 2026
Caste certificates were distributed to 95 tribal citizens under Adim Seva Abhiyan at Shilimb through MLA Sunil Shelke

आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून शिळींब येथे आदिम सेवा अभियान अंतर्गत ९५ आदिवासी नागरिकांना जातीचे दाखले वाटप

March 17, 2026
Dnyaneshwari lost her life due to mistake by tempo driver transporting gas cylinders incident at Somatane Phata Maval

गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाच्या एका चुकीने ज्ञानेश्वरीने गमावला जीव ; सोमाटणे फाटा येथील मन सुन्न करणारी घटना

March 17, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

March 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.