Dainik Maval News : मृत महिलेसह तिच्या जिवंत दोन मुलांना इंद्रायणी नदीत फेकून दिलेल्या गुन्ह्यातील पाचव्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. कविता विष्णू जाधव (वय 37, रा. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या महिला आरोपीचे नाव आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
नराधम प्रियकराने समरीन निसार नेवरेकर (वय 25), ईशांत (बय 5), इजान (वय 2) यांना इंद्रायणी नदीत फेकून दिल्याची घटना जुलै महिन्यात उघडकीस आली होती. या हत्याकांडाने मावळ तालुक्यासह संपूर्ण राज्य हादरले होते. याप्रकरणी पोलिसांनी प्रमुख आरोपी गजेंद्र दगडखैर (वय 37, रा. वराळे), रविकांत भानुदास गायकवाड (वय 41, रा. अहमदनगर), मध्यस्थी महिला उषा बुधवंत आणि गर्भपात करणारा डॉक्टर अर्जुन पोळ यांना यापूर्वीच अटक केली आहे.
कविता गायकवाड हिची चौकशी केली असता तिचा हत्येच्या कटात सहभाग असल्याचे निदर्शनास आल्याने गुरुवारी तिलाही अटक करण्यात आली. इंद्रायणी नदीत फेकून दिलेल्या तिघा मायलेकांचा सव्वा महिना उलटून गेला तरीही शोध लागलेला नाही. दरम्यान सदर गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आलेली आहे.
अधिक वाचा –
– पवन मावळ विभागातील 800 विद्यार्थीनींना ‘गुड टच – बड टॅच’चे धडे ; रोटरी क्लब आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांचा उपक्रम
– आनंदाची बातमी ! कार्ला – मळवली दरम्यानचा नवा पूल लहान वाहनांसाठी खुला, स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा । Karla News
– अजितदादांच्या निर्देशानुसार लोणावळा शहरात ऑनलाइन वाहतूकसेवा बंद झाली पाहिजे – आमदार सुनील शेळके