तळेगाव दाभाडे आणि शेलारवाडी येथील डीआरडीओ (DRDO) प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे वाढीव मोबदला त्वरित देण्यात यावा अशी मागणी रविंद्र भेगडे यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कडे केली असून मध्यस्थीची मागणी केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वडगाव जिल्हा न्यायालयाने तळेगाव दाभाडे व शेलारवाडी मधील भूमिपुत्रांच्या २२ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यापश्चात DRDO प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला त्वरित देण्यात यावा असे आदेश पारित केले. या आदेशानुसार शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने , निकालाविरोधात वरीष्ठ न्यायालयात दाद न मागता संरक्षण विभागाने जिल्हा न्यायालयच्या निकालाचा उचित सन्मान करून , शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यात येण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.
त्यासंबंधी शिफारस करावी अशी मागणी रविंद्र भेगडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय सहकार राज्यमंत्री आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पुणे येथे सदर निवेदन मंत्रोमहोदयांना देण्यात आले. याप्रसंगी मावळ भाजपा ता.संघटन मंत्री संतोष राक्षे हे देखील उपस्थित होते.
अधिक वाचा –
– पवन मावळ विभागातील 800 विद्यार्थीनींना ‘गुड टच – बड टॅच’चे धडे ; रोटरी क्लब आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांचा उपक्रम
– आनंदाची बातमी ! कार्ला – मळवली दरम्यानचा नवा पूल लहान वाहनांसाठी खुला, स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा । Karla News
– अजितदादांच्या निर्देशानुसार लोणावळा शहरात ऑनलाइन वाहतूकसेवा बंद झाली पाहिजे – आमदार सुनील शेळके