Dainik Maval News : पवन मावळ विभागातील पवना धरणाच्या बाजूला असलेल्या आंबेगाव हद्दीतील कॅम्पिंग साईटवर आज, शुक्रवारी (दि.७) बिबट्या आढळून आला आहे. एका झाडावर हा बिबट्या बसला असून ग्रामस्थांपैकी एकाने बिबट्याचा वावर कॅमेरात कैद केला आहे.
तत्पूर्वी बिबट्याने गावातीलच एका व्यक्तीवर, नाव बाळू शिंदे (रा. शिंदगाव, ता. मावळ) यावर हल्ला केला. यात बिबट्याने सदर व्यक्तीच्या पायावर चावा घेतल्याने ते जखमी झाले आहेत, त्यानंतर बिबट्या कॅम्पिंग साईटवरील एका उंबराच्या झाडावर चढून बसला आहे. पर्यटकांचा सदैव वावर असणाऱ्या या भागात बिबट्या असल्याचे समजताच ग्रामस्थांसह पर्यटकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
- ग्रामस्थांनी ही माहिती वन विभाग, पोलिस विभाग यांना कळविली असून वन विभागाचे व पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी रवना झाले आहे. सध्या बिबट प्राणी झाडावर असल्याची माहिती असून त्याला पकडून सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिकासात सोडण्याचा वन विभागाचा प्रयत्न आहे. प्रशासनाने नागरिकांसह पर्यटकांना भीती न बाळगता शांततेचे आवाहन केले आहे.
‘बिबट्याला सुरक्षितरित्या पकडून सुखरूपरित्या जंगलात सोडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,’ असे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान बिबट्याचा वावर असल्याचे लक्षात येताच नागरिकांसह तेथील पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी पाठविण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अभ्यासिकेत अभ्यास केलेले चार विद्यार्थी बनले अधिकारी ; मुख्याधिकाऱ्यांनी केला सन्मान । Talegaon Dabhade
– देहू नगरपंचायतीला यात्रा अनुदान कधी मिळणार? नागरिकांच्या मिळकत करातून होतोय कोट्यवधीचा खर्च । Dehu News
– पिंपरी-चिंचवड शहरासाठी मुळशी धरणातील पाणी आरक्षणाची मागणी ; मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना निवेदन