Dainik Maval News : पवना धरण परिसरातील आंबेगाव हद्दीत शुक्रवारी (दि.७) वावरणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिकांनी गोंधळ घातल्याने बिबट्या बिथरला. त्याच्या हल्ल्यात सहा जण जखमी झाले. काही नागरिकांनी बिबट्याला चुकीच्या पद्धतीने पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर वन विभागाने वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मावळ तालुक्यातील आंबेगाव हद्दीत शुक्रवारी (दि.७) सकाळी बिबट्या आढळला होता. उंबराच्या झाडावर त्याने मुक्काम ठोकला होता. दरम्यान, ही माहिती पसरताच बिबट्या पाहण्यासाठी गर्दी झाली. यावेळी नागरिकांना शांतता राखता आली नाही. त्याचवेळी कुत्र्यांचे भुंकणे, गोंगाट आणि बघ्यांची गर्दी यामुळे बिबट्या बिथरला आणि बचावाच्या प्रयत्नात त्याने काही नागरिकांवर हल्ला केला.
- घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक दाखल झाले, तेव्हा बिबट्या झाडावरच बसलेला होता. त्याला सुरक्षितपणे जंगलात पाठविण्यासाठी वनविभागाने प्रयत्न केले. याचवेळी ग्रामस्थ, वन्यजीव रक्षक संस्था व वनविभागाने कसरत करीत बिबट्याला पकडले. यानंतर त्याळा बावधन येथील वन्यजीव ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर येथे दाखळ करण्यात आले. यावेळी बिबट्याला इजा होऊ नये, म्हणून उपाययोजना करण्यात आल्या होत्या असे असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.
दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई
बिबट्याजवळ नागरिकांनी गोंधळ घातला. जवळ जाऊन फोटो व व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला. बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे या घटनेचा तपास सुरू असून, दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती उप वनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अभ्यासिकेत अभ्यास केलेले चार विद्यार्थी बनले अधिकारी ; मुख्याधिकाऱ्यांनी केला सन्मान । Talegaon Dabhade
– देहू नगरपंचायतीला यात्रा अनुदान कधी मिळणार? नागरिकांच्या मिळकत करातून होतोय कोट्यवधीचा खर्च । Dehu News
– पिंपरी-चिंचवड शहरासाठी मुळशी धरणातील पाणी आरक्षणाची मागणी ; मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना निवेदन