पुणे ( Pune ) शहराजवळील हवेली तालुक्यातील ( Haveli Taluka ) केसनंद तळेरानवाडी ( Kesnand Taleranwadi ) येथे बिबट्याचा वावर असल्याची माहिती समोर येत आहे. या भागात अद्यापही बिबट्याचा वावर असल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. ( Leopards Video Viral )
हवेलीतील केसनंद तळेरानवाडी येथे मंगळवार (13 सप्टेंबर) पहाटे चारच्या सुमारास वसंत साहेबराव हरगुडे या शेतकऱ्याच्या गोठ्यातील दोन वर्षांच्या वासरावर बिबट्याने हल्ला ( Leopard Attack ) करुन त्याला ठार केले. त्यामुळे गावातील आणि परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिस पाटील पंडित हरगुडे यांनी केले आहे. ( Leopards At Kesnand Taleranwadi Video Viral Haveli Taluka Pune )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
खेड आणि मावळ तालुक्यातही दहशत…
खेड आणि जवळील मावळ, आंबेगाव, शिरूर तालुक्याच्या हद्दीतही बिबट्यांचा वावर असल्याची माहिती समोर येत आहे. नानोलीतर्फे चाकण तसेच खेड तालुक्याला लागुनच असलेल्या इंदोरी, जाधववाडी धरण परिसरात बिबट्याचे नियमित दर्शन होत असल्यामुळे खेड तालुक्याच्या हद्दीवरील नागरिक भयभीत झाले आहेत. नानोली तर्फे चाकण परिसरातील फिरंगाईदेवी डोंगर परिसरातील घनदाट वनक्षेत्र तसेच या परिसरातील भटके कुत्रे, पोल्ट्री फार्म आदी अन्न आणि पाणी या भागात आहे. तसेच, मोठ्या प्रमाणात ऊसक्षेत्र असल्यामुळे येथे बिबट्याचे दर्शन घडत आहे. ( Leopards At Pune District )
अधिक वाचा –
Video : आवडीने पनीर खाताय? आधी ही बातमी नक्की वाचा…
धक्कादायक! पौडमधल्या प्रसिद्ध बेकरीच्या खाद्य पदार्थात आढळला टिशू पेपर, तक्रार दाखल