मावळ तालुक्यातील कान्हे येथील महिंद्रा लॉजिस्टीक कंपनीच्या आवारात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. कंपनीच्या आवारातील बिबट्याचा वावर तेथील सीसीटीव्ही कॅमेरात (7 जानेवारी) कैद झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच वन विभाग, वन्यजीव रक्षक संस्था मावळ यांचे सदस्य घटनास्थळी आले असून बिबट्याचा शोध सुरु करण्यात आला आहे. ‘भक्ष्याच्या शोधात हा बिबट्या इथे आला असावा, सध्या सर्च ऑपरेशन सुरु आहे,’ अशी माहिती वन्यजीव रक्षक संस्था मावळचे अध्यक्ष निलेश गराडे यांनी दिली. ( Leopards Seen In Mahindra Company Area At Kanhe Village Of Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– राष्ट्रवादी महिला काँग्रेसची जन जागर यात्रा; बेरोजगारी आणि महागाई विरोधात मावळ तालुक्यात सावित्रीच्या लेकींचा एल्गार
– व्हिडिओ – शिंग्रोबाचीच कृपा, बोरघाटात ब्रेक फेल झालेली बस झाडाला अडकली, 64 विद्यार्थी बचावले