व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राष्ट्रवादी महिला काँग्रेसची जन जागर यात्रा; बेरोजगारी आणि महागाई विरोधात मावळ तालुक्यात सावित्रीच्या लेकींचा एल्गार

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली भूमी श्री क्षेत्र देहू येथून यात्रेला शुक्रवारी (6 जानेवारी) प्रारंभ करण्यात आला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 7, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, लोकल, शहर
NCP-Jan-Jagar-Yatra-Maval-Taluka

Photo : FB / Sunil Shelke


वाढत्या महागाईच्या विरोधात आणि बेरोजगारीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘जनजागर यात्रेचे’ मावळ विधानसभेतील श्री क्षेत्र देहू, देहूरोड, तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा या शहरांमध्ये मावळ राष्ट्रवादीकडून स्वागत करण्यात आले. तालुक्यात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली भूमी श्री क्षेत्र देहू येथून यात्रेला शुक्रवारी (6 जानेवारी) प्रारंभ करण्यात आला. ( NCP Nationalist Mahila Congress Jan Jagar Yatra Against Unemployment And Inflation Maval Taluka )

Novel NIBR Ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

वाढत्या महागाईमुळे, बेरोजगारीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. परंतु सत्ताधाऱ्यांना याचे गांभीर्य नसून जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यावर आवाज उठवण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे महागाई, बेरोजगारी या विषयांवर आपली भुमिका मांडुन सर्वसामान्यांना जागरुक करायचे आहे. सावित्रीच्या लेकी महागाई विरोधात, बेरोजगारी विरोधात आवाज उठवून जागर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना बळ देण्याचे काम आपल्या सर्वांचे आहे. सत्ताधारी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर सर्वांनीच मते व्यक्त करायला हवीत, असे आमदार सुनिल शेळके यांनी म्हटले.

यावेळी आमदार सुनिल शेळके यांच्यासह राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्रीमती विद्याताई चव्हाण, प्रदेश निरीक्षक आशा मिरगे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा कविता म्हेत्रे, जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, माजी तालुका अध्यक्ष गणेश ढोरे, तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, माजी सभापती बाबुराव वायकर, नगराध्यक्ष मयूर ढोरे, जि.नि. समिती सदस्य विठ्ठलराव शिंदे, कार्याध्यक्ष साहेबराव कारके, युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष संदीप आंद्रे, कार्याध्यक्ष ओबीसी सेल अतुल राऊत, तालुकाध्यक्षा दिपाली गराडे, ॲड. रुपालीताई दाभाडे, शितल हगवणे, पुष्पा घोजगे, संध्या थोरात, भिकाबाई वाघमारे, वर्षाताई नवघणे तसेच सर्व शहरांचे अध्यक्ष, नगरसेवक, स्थानिक आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Novel NIBR Ads

अधिक वाचा –

– व्हिडिओ – शिंग्रोबाचीच कृपा, बोरघाटात ब्रेक फेल झालेली बस झाडाला अडकली, 64 विद्यार्थी बचावले
– मुळशी संघर्ष समितीकडून तहसीलदारांना स्मरणपत्र; अल्टिमेटम संपला तर भविष्यातील आंदोलनाची दिशा ठरली


dainik maval jahirat

Previous Post

देवले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जयश्री गाडे बिनविरोध

Next Post

बिबट्या आला रे.! मावळ तालुक्यातील कान्हे येथील महिंद्रा कंपनीच्या आवारात बिबट्याचा वावर – पाहा व्हिडिओ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Leopards-Seen-in-Maval-Taluka

बिबट्या आला रे.! मावळ तालुक्यातील कान्हे येथील महिंद्रा कंपनीच्या आवारात बिबट्याचा वावर - पाहा व्हिडिओ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MNS submits memorandum to Public Works Department regarding incomplete work on Karla Phata–Malavli road

कार्ला फाटा ते मळवली रस्त्याच्या अर्धवट कामासंदर्भात ‘मनसे’चे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन; आंदोलनाचा इशारा

June 26, 2026
Issue of traffic congestion at weekly market in Vadgaon Maval comes to fore

वडगाव मावळ येथील आठवडे बाजारातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

June 26, 2026
Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
Demand to reroute power line obstructingthe paragliding hill in Kamshet Maval

कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिलला अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गात बदल करण्याची मागणी

June 25, 2026
Ashadhi-Wari

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

June 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.