पवना धरणातून वाहणारी पवना नदी मावळ तालुक्यातून चांगल्या पद्धतीने वाहते. परंतू पुढे मात्र ती खराब झाली आहे. याला पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन जबाबदार आहे. पिंपरी चिंचवडला पवना धरणातील पाणी पाहिजे पण पवना नदी नको, असं का? असा रोकडा सवाल करत पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द करा अन्यथा सन 2011 पेक्षा तीव्र आंदोलन उभे करू, असा इशारा पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे वरिष्ठ उपाध्यक्ष किशोर भेगडे यांनी दिला आहे.
किशोर भेगडे यांनी आणि सहकाऱ्यांनी याबाबत मावळ तालुका तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना गुरुवारी (दिनांक 31 ऑगस्ट) रोजी निवेदन दिले. यावेळी किशोर भेगडे यांच्यासह नितीन बोडके, नंदकुमार गराडे, अर्जुन गराडे, दिलीप राक्षे, राकेश घारे, अविनाश गराडे, बबळू कालेकर,गणेश सावंत, संजय होडगे, अतुल राऊत, स्वप्नील घोरे, गणेश कालेकर, ज्ञानेश्वर तिखे, विजय निंबळे, दिनेश ठोंबरे, अशोक सातकर आदी जण उपस्थित होते. ( letter from kishor bhegde to CM and maval tehsildar vikram deshmukh regarding pavana dam and river )
“पवना धरणापासून पवना नदी पवन मावळ मार्गे पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत जाते. मावळ तालुक्यातून ही नदी अतिशय स्वच्छ वाहते. त्यामुळे तिला पवन मावळची जीवनदायिनी देखील म्हटले जाते. मात्र हिच नदी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत गेल्यानंतर अत्यंत प्रदूषित होते आणि दुर्दैवाने तिला मैलावाहिनी असे बोलावे लागते.” – किशोर भेगडे
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– रांजणगाव इथे उभे राहणार ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’, केंद्राकडून 62.39 कोटींचा निधी राज्य सरकारकडे वर्ग
– माळवाडी येथील रस्ता काँक्रिटीकरण कामाला सुरुवात; नागरिकांनी मानले आमदार सुनिल शेळकेंचे आभार
– Breaking! पवना नदीकाठच्या नागरिकांना महत्वाची सुचना, लगेच वाचा