सकल मराठा समाज मावळ यांच्याकडून सोमवारी (दिनांक 4 सप्टेंबर 2023) मावळ बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली (जालना) इथे आंदोलन सुरु होते. तेव्हा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. तसेच हवेत गोळीबार करुन पोलिसी बळाचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. ह्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी राज्यभर ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. ह्याच घटनेच्या निषेधार्थ सोमवारी सकल मराठा समाज मावळ यांच्या वतीने मावळ बंदची हाक देण्यात आली आहे.
जालन्यात मराठा बांधवांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु होते. मात्र, शुक्रवारी अचानक अंबड येथील आंदोलक आणि पोलिस दल यांच्यात हिंसा सुरु झाली. दगडफे करण्यात आली, पोलिसांकडून लाठीमार – अश्रूधुराचा वापर तसेच रबरी गोळ्यांचा वापर करण्यात आला. ह्या हिंसेत अनेक मराठा आंदोलक महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने जखमी झाल्या. ही माहिती राज्यभर पसरताच मराठा समाजाकडून निषेध व्यक्त केला जात आहे. ( sakal maratha samaj has called for maval bandh on monday september 4 )
ह्याच पार्श्वभूमीवर ‘सकल मराठा समाज मावळ यांच्याकडून सोमवारी (दिनांक 4 सप्टेंबर 2023) मावळ बंदची हाक देण्यात आली आहे. यावेळी तालुक्यातील सर्व शहर – गाव भागातील दुकाने, कंपन्या बंद राहतील. नागरिकही ह्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देतील अशी आम्हाला आशा आहे,’ अशी माहिती युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश वाघोले यांनी दैनिक मावळला दिली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘इलेक्ट्रिकल टेक्निशियन यांना चांगली पगारवाढ देण्यासाठी सरकार प्रयत्नशील, लवकरच निर्णय’
– रांजणगाव इथे उभे राहणार ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’, केंद्राकडून 62.39 कोटींचा निधी राज्य सरकारकडे वर्ग
– माळवाडी येथील रस्ता काँक्रिटीकरण कामाला सुरुवात; नागरिकांनी मानले आमदार सुनिल शेळकेंचे आभार