वडगाव मावळ शहर म्हणजे मावळ तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण. इथे असणारी तहसील सहीत विविध शासकीय कार्यालये आणि न्यायालये यांमुळे इथे कायमस्वरूपी गर्दी असते. मागील अनेक दिवसांपासून वडगाव मावळ शहरात अंतर्गत रस्त्यांची कामे होत आहेत. सध्या शहरातील प्रमुख बाजार पेठेतील रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. अशात या मुख्य बाजार पेठेत असणारे व्यावसायिक तसेच घर मालक यांनी रस्त्यांच्या लांबी संदर्भात मुख्याधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वडगाव मावळ मुख्य बाजार पेठेतील सर्व घरमालक यांनी नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन पत्र दिले आहे. ज्यात, मुख्य रस्ता 15 मीटर आहे, अशी चर्चा आहे. पण जागेवर मात्र 10 मीटर मिळत आहे आणि झाला आहे. तरीही हा रस्ता होणाऱ्या डी.पी.मध्ये कायम असावा आणि त्याला लागून 1 मीटर साईड पट्टी असावी, अशी विनंती बाजार पेठेतील सर्व घरमालक यांनी मुख्याधिकारी यांना भेटून पत्राद्वारे निवेदन देत केली आहे. ( letter from locals to CEO regarding road construction in main market of vadgaon maval )
वडगाव नगरपंचायत मुख्याधिकारी प्रवीण निकम यांना वडगाव शहरातील जेष्ठ नेते गणेश ढोरे, उद्योजक गणेश भेगडे, डॉ. कुंदन बाफणा, महेंद्र खांदवे, अतुल राऊत, मनोज गुजराणी, महेंद्र बाफणा, सचिन ओसवाल आदींनी भेटून हे निवेदन दिले.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! जम्मू काश्मीरमधील राजौरीत लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला, 4 जवान शहीद
– मोठी बातमी! तब्बल 40 ड्रोन्सचा वापर करुन ‘एनआयए’ने रोखले मुंबईवरील दहशतवादी हल्ले
– महत्वाची बातमी! ‘तळेगाव-चाकण-शिक्रापूर’ दरम्यान उन्नत मार्गाला लवकरच केंद्र सरकारची मंजुरी मिळणार