मावळ तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत चालु असलेल्या 104 नळ पाणीपुरवठा योजनेची व मावळ तालुक्यातील पी.डब्ल्यु.डी. सार्वजनिक बांधकाम विभाग वडगाव मावळ यांचे अंतर्गत सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामातील दिरगांई आणि भ्रष्टाचार या वर आगामी अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे आवाज उठवावा, अशी मागणी मावळ तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी आमदार सुनिल शेळके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर मच्छिंद्र गुजर, गणेश लालगुडे, शोभीनाथ भोईर, दत्तात्रय काजळे, सतिश ढमाले, अनिल घारे, लहु चांदगुडे आदींच्या सह्या आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
याबाबत आमदार सुनिल शेळके यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, मावळ तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत चालु असलेल्या 104 नळ पाणी पुरवठा योजनेंची कामे निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. सदर कामे इस्टूमेंट प्रमाणे झालेली नाहीत. बहुतांश योजनेमध्ये शासनाने घालुन दिलेल्या नियम व अटींचे उल्लंघन करण्यात आलेले आहे. या कामांमध्ये करोडो रूपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. पाण्यांच्या टाक्यांची कामे निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. या सर्व कामांचे स्ट्रक्चर ऑडीट करण्यात यावे.
तसेच, नळ पाणी पुरवठा योजना काही गावांमध्ये 20 टक्के काही ठिकाणी 40 टक्के काही ठिकाणी अर्धवट अवस्थेत असल्याचे निदर्शनास येत आहे. या कामामध्ये पाईप शासनाने नियम व अटींमध्ये ठरवुन दिलेले असताना देखील वापरण्यात आलेले नाहीत? काम करत असताना पाईप लाईनची जी शासनाने ठरवुन दिलेल्या खोली व रूंदी ती प्रत्यक्षात पायदळी नियम व अटी तुडवण्यात आली आहेत. काही कामे अर्धवट अवस्थेत आहेत व काही ठिकाणी कामे रेंगाळली आहेत. हि कामे मुदतीत व नियम अटींमध्ये झालेली नाहीत. पाणीपुरवठा अधिकारी ह्या सर्व कामांची मुदतवाढ घेतली आहे, अशी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. परंतु या कामांची कुठल्याही प्रकारे मुदतवाढीचे आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झालेले नसताना देखील मुदतवाढ घेतली आहे, अशी दिशाभुल करणारी उत्तरे देत आहेत. या सर्व कामाबाबत आपण पावसाळी अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करून जलजीवन मिशन अंतर्गत चालु असलेल्या मावळ तालुक्यातील 104 पाणी पुरवठा योजनेची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. ( Letter to mla sunil shelke regarding Jal Jeevan Mission Scheme And Road Construction in Maval Taluka )
तसेच, मावळ तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग (पी.डब्ल्यु.डी.) अंतर्गत चालु असलेल्या रस्त्यांची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. काही ठिकाणी एक या दोन लेयर टाकलेच नाही. काही ठिकाणी मोऱ्या न टाकता कामे करण्यात आली आहेत. काही ठिकाणी तुटक्या मोऱ्या टाकण्यात आल्या आहेत. काही कामे मावळ तालुक्यामध्ये अर्धवट अवस्थेत ठेकेदारांनी व अधिकारी यांच्या मिलिभगत (संगनमताने) अपुर्ण अवस्थेत आहे. यामध्ये काही रस्त्यांमध्ये जी.एस.बी. व डी.एल.सी. अशा प्रकारचे लेयर टाकण्यातच आले नाही. तालुक्याअंतर्गत झालेल्या सर्व कामांची स्ट्रक्चर ऑडीट करण्याचे आदेश द्यावेत व तसे मुददे आपण अधिवेशनामध्ये उपस्थित करावे.
सदर कामांच्या मुदती संपुन देखील कामे अद्याप झालेली नाही. कामांच्या मुदतवाढी सुध्दा वरिष्ठ कार्यालयाकडून घेण्यात आलेल्या नाही. तसे आदेश संबंधित विभागाकडे प्राप्त नाहीत. पी.डब्ल्यु.डी. या विभागाच्या अंतर्गत मावळ तालुक्यामध्ये झालेल्या कामांमध्ये करोडो रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे आपल्या निदर्शनास येईल. या सर्व कामांची आपण उच्चस्तरीय चौकशीची मागणी करावी, अशी विनंती मावळ तालुक्यातील जनतेच्या वतीने आपणाकडे करत आहोत. हे दोन्ही मुदद्दे अतिशय महत्वाचे व आपल्या तालुक्याच्या जिव्हाळयाचे असल्याकारणे आपण हे दोन्ही मुद्दे पावसाळी अधिवेशन मध्ये उपस्थित करून योग्य ती चौकशी करून दोषींवरती कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.
अधिक वाचा –
– देहूरोड ते खेडशिवापूर दरम्यान पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन । Pune News
– Chanakya Niti : ‘या’ कारणांमुळे वाढतो पती आणि पत्नीत दुरावा, जाणून घ्या सुखी वैवाहिक जीवनाचा मंत्र
– पुण्यात अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा ; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट निर्देश