Dainik Maval News : दिल्ली येथे झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘मराठी भाषा व महाराष्ट्र धर्म’ या परिसंवादात सहभाग घेतल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ यांचा वडगाव येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
- याप्रसंगी क्रीडा प्रशिक्षक बिहारीलाल दुबे, माजी कामगार आयुक्त संभाजी मोरे, निवृत्त नायब तहसीलदार किसनराव वहिले, चंद्रकांत राऊत, ज्ञानेश्वर ढोरे, श्रीधर ढोरे, लक्ष्मण ढोरे, बाळासाहेब झरेकर, बबनराव कदम, नंदकुमार दंडेल आदी उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वक्ता म्हणून निवड झाल्याबद्दल तसेच ओव्हाळ यांच्या एकूणच साहित्य कृतीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी परिसंवादातील अनुभवही कथन केले. नितीन भांबळ यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुरेश कुडे यांनी आभार मानले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पुणे रिंगरोड’च्या दिशेने पहिले पाऊल ! जमीन मोजणीला प्रारंभ ; जमीनमालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र । Pune Ring Road
– मुंबईला जाण्यासाठी नवा मार्ग विकसित होणार? 135 किलोमीटरचा रस्ता, लोणावळ्याला जायची गरज नाही
– मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune
– मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान