Dainik Maval News : शुक्रवारी, दिनांक 9 ऑगस्ट रोजी असलेल्या जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी बहुल गावांतील नागरिकांना छोटंसं गिफ्ट मिळाले आहे. शुक्रवारी (दिनांक 9 ऑगस्ट) रोजी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आंबेगाव, जुन्नर आणि मावळ तालुक्यातील पेसा क्षेत्रातील आदिवासी बहुल गावामध्ये स्थानिक सुट्टी जाहीर केल्याचे आदेश जारी केले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दरवर्षी 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. 23 डिसेंबर 1994 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जाईल. या दिवशी सर्व जण आदिवासी बांधव एकत्र येतात आणि आपापल्या संस्कृती प्रमाणे वेशभूषा करतात, गाणे आणि नृत्य करून हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करतात. ( local holiday declared on occasion of Adivasi Day in tribal dominated villages including Maval taluka )
जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचा आदेश –
आदिवासी दिनानिमित्त 9 ऑगस्ट रोजी आदिवासीबहुल गावांमध्ये स्थानिक सुट्टी जाहीर – “जागतिक आदिवासी दिनानिमित्त 9 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आंबेगाव, जुन्नर व मावळ तालुक्यातील पेसा क्षेत्रातील आदिवासी बहुल गावामध्ये स्थानिक सुट्टी जाहीर केल्याचे आदेश जारी केले आहेत.”
आदिवासी कलाकृतींच्या प्रदर्शनाचे आयोजन –
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (टीआरटीआय) येथे 9 ते 10 ऑगस्ट या कालावधी आदिवासी हस्तकला प्रदर्शन व विक्री, खाद्यमहोत्सव व कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रदर्शनाचे उदघाटन 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे. या प्रदर्शनात राज्यातील विविध भागातील आदिवासी कलाकारांनी तयार केलेल्या बांबू, लाकडाच्या, कापडाच्या दैनंदिन वापराच्या व शोभेच्या वस्तू, वारली चित्रकला, खाद्यपदार्थ, रानभाज्या, वनऔषधे आदींचे प्रदर्शन व विक्रीसाठी स्टॉल उभारण्यात येणार आहेत.
आदिवासी कलासंस्कृतीचे जतन, संवर्धन आणि प्रचार व प्रसार करणाऱ्या या प्रदर्शनास अधिकाधिक नागरिकांनी भेट द्यावी. आदिवासी कलाकारांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी करून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन संस्थेच्या सहसंचालक चंचल पाटील यांनी केले आहे.
अधिक वाचा –
– एकविरा देवी मंदिर कार्ला येथे फनिक्युलर रेल्वे उभारण्यास तांत्रिक मान्यता ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती । Karla Ekvira Devi
– “आप्पा.. आता तुम्ही थांबू नका” , मावळ भाजपा कार्यकर्त्यांच्या असंतोषाचा चेहरा – रविंद्र आप्पा भेगडे
– महिला, युवक, पोलीस अधिकारी सर्वांनीच केले रक्तदान ; खोपोलीत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद । Khopoli News