Dainik Maval News : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या माध्यमातून दरवर्षी एका गडापासून दुसऱ्या गडापर्यंत धारातीर्थ गडकोट मोहीमेचे आयोजन केले जाते. यावर्षीचीही मावळ तालुक्यात असून किल्ले श्री लोहगड ते किल्ले श्री भिवगड (मार्गे श्री एकवीरा देवी व श्री राजमाची गड) अशी ही मोहीम होणार आहे.
दरवर्षी देशभरातून हजारो धारकरी या मोहिमेसाठी येत असतात. २३ वर्षानंतर मावळात मोहीम असल्यामुळे मावळ तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी व शिवभक्तांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे. श्री संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम चालते. यावर्षीही मोहीम दिनांक 23 जानेवारी 2026 ते 26 जानेवारी 2026 या दरम्यान लोहगड व भिवगड या दरम्यानच्या भागांमध्ये पार पडणार आहे.
भगव्या झेंड्याच्या नेतृत्वामध्ये या मोहिमेमध्ये सर्व धारकरी सामील होतात. छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी या मोहिमेचे आयोजन केले जाते.
गडकिल्ले व इतिहास यांचे जतन व संवर्धन होण्यासाठी त्याच बरोबर नवीन पिढीला शिवाजी महाराजांचा इतिहास समजण्यासाठी या मोहिमांचे आयोजन दरवर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून केले जाते निर्व्यसनी व देशभक्त तरुण पिढी निर्माण करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.
गडकोट मोहीम मावळ तालुक्यामध्ये जाहीर झाल्यामुळे मावळ तालुक्यामधील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. देशभरातून येणाऱ्या धारकऱ्यांच्या स्वागतासाठी मावळ तालुका सज्ज असल्याचे सांगितले जात आहे. या वर्षी मावळ तालुक्यातून 10,000 पेक्षा जास्त धारकरी मोहिमेत सहभागी होणार आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– कोण होणार वडगाव नगरपंचायतीचा उपनगराध्यक्ष ? ‘या’ 5 नावांची सर्वाधिक चर्चा, पाहा कोण आहे यादीत सर्वात टॉपवर
– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दिलेल्या जनादेशाबद्दल अजित पवारांनी मानले मावळच्या जनतेचे आभार
– वडगाव, लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तर तळेगाव दाभाडे शहरात भाजपाचा नगराध्यक्ष ; तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक
– पतीचा पराभव, पण पत्नीचा विजय ; कुठे १ मताने तर कुठे २ मताने उमेदवार विजयी ! मावळातील वडगाव नगरपंचायतीचा निकाल ठरला लक्षवेधी