व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महाराष्ट्रात महाविकासआघाडीला घवघवीत यश ! वडगाव मावळ येथे मविआ कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा । Vadgaon Maval

देशपातळीवर यंदाची लोकसभा निवडणूक एनडीए आघाडी विरुद्ध इंडिया आघाडी अशी लढली गेली असली तरीही महाराष्ट्रात मात्र महायुती विरोधात महाविकासआघाडी अशीच लढत झाली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 6, 2024
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Lok Sabha 2024 Results Mahavikas Aghadi success in Maharashtra

Photo Courtesy : Team Dainik Maval


नुकताच लोकसभा निवडणूक 2024 चा अंतिम निकाल जाहीर झाला. देशपातळीवर यंदाची लोकसभा निवडणूक एनडीए आघाडी विरुद्ध इंडिया आघाडी अशी लढली गेली असली तरीही महाराष्ट्रात मात्र महायुती विरोधात महाविकासआघाडी अशीच लढत झाली. यावेळच्या लढाईत महाविकासआघाडीने घवघवीय यश संपादित केले. महाराष्ट्रातील एकूण 48 जागांपैकी महाविकासआघाडीने तब्बल 30 जागा जिंकल्या. महाविकास आघाडीच्या या यशाबद्दल वडगाव मावळ शहरात मविआ कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

निकाल जाहीर झाल्यानंतर सायंकाळी (दि. 4 जून) जवळपास देशातील आणि राज्यातील चित्र स्पष्ट झाले. देशात जरी एनडीएला बहुमत मिळाले तरीही 2019 च्या तुलनेत यावेळी इंडिया आघाडीने चांगलीच मुसंडी मारली. त्यात महाराष्ट्राचा वाटा मोलाचा राहिला. महाराष्ट्रात 48पैकी 30 जागांवर आणि एक अपक्ष अशा 31 जागांवर महाविकासआघाडीचे खासदार निवडून आले, तर कित्येक जागा या निसटत्या पराभवाने हातातून गेल्या. मविआचा हा विजय मोठा असून मावळ तालुक्यातील वडगाव शहरात महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, घोषणाबाजी केली आणि आनंद साजरा केला. ( Lok Sabha 2024 Results Mahavikas Aghadi success in Maharashtra MVA workers Celebration at Vadgaon Maval )

यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रभारी व प्रचार प्रमुख अतुल राऊत, मावळ तालुका रा. काँ. युवक अध्यक्ष (शरद पवार गट) विशाल वहिले, जिल्हा सरचिटणीस सुनिल शिंदे, मावळ तालुका सहकार सेल अध्यक्ष सुधाकर वाघमारे, मावळ तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष आफताब सय्यद, राजूशेठ बाफना, मा. ग्रा. पं.सदस्य सोमनाथ धोंगडे, तुषार वहिले, रवींद्र गायकवाड, सतीश जांभूळकर, दिपक कोकाटे, राहील तांबोळी, सचिन हिरे आदी उपस्थित होते.

मावळात महाविकासआघाडीच्या उमेदवाराचा पराभव –
राज्यात जरी महाविकासआघाडीचा डंका वाजला असला तरीही मावळ लोकसभेत मात्र मविआच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. मावळ लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी महाविकासआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा 96 हजार मतांनी पराभव केला. बारणेंनी खासदारकीची हॅटट्रीक केलीये. असे असले तरीही नवख्या संजोग वाघेरे यांनी श्रीरंग बारणेंना चांगलीच झुंज दिली. महत्वाचे म्हणजे या निवडणूकीत मविआची ताकद दिसून आली.

अधिक वाचा –
– थराराक ! मावळ तालुक्यात दोन गटात हाणामारी, एकाचा जागीच मृत्यू, अनेकजण जखमी । Maval Crime
– मावळात श्रीरंग बारणेंना मिळालेल्या आघाडीपेक्षा न मिळालेल्या मताधिक्याची चर्चा ! भाजपा की राष्ट्रवादी, नक्की कुणामुळे मतं घटली?
– कौतूकास्पद ! तळेगाव नगरपरिषदेकडून एकाच दिवशी तब्बल 200 झाडांची लागवड, जागतिक पर्यावरण दिनी राबवला उपक्रम । Talegaon Dabhade


Previous Post

श्रीरंग बारणेंच्या विजयानंतर मावळात भाजपाचा जल्लोष ! वडगाव आणि तळेगाव शहरात फटाके फोडून मिठाईचे केले वाटप । Maval News

Next Post

संजोग वाघेरे यांच्या पराभवाची प्रमुख 5 कारणे, नक्की वाचा । Maval Lok Sabha 2024

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Reasons Of Sanjog Waghere Defeat

संजोग वाघेरे यांच्या पराभवाची प्रमुख 5 कारणे, नक्की वाचा । Maval Lok Sabha 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.