Dainik Maval News : पर्यटननगरी लोणावळा शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. लोणावळ्यातील प्रसिद्ध चिक्की विक्रेत्यास अज्ञातांनी पिस्तूलाचा धाक दाखलवून लुटले आहे. ह्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.
अज्ञात चोरांनी तरुणांनी मारहाण करत, पिस्तुलाचा धाक दाखवून चिक्की विक्रेत्याला लुटले, ही घटना रविवारी घडली. वीकेंड असल्याने लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते, हे लक्षात घेऊन अनेक दुकानदार पहाटे चिक्कीची दुकाने उघडतात. त्यामुळे चोरट्यांनी पहाटेच्या साडेपाचच्या सुमारास हा गुन्हा केला.
जुना पुणे- मुंबई महामार्गावरील गवळी वाडा येथील चिक्कीच्या दुकानात अज्ञातांनी पिस्तुलाचा धाक दाखवून विक्रेत्याला लुटले. रुमालाने तोंड बांधून आलेल्या दोघांनी चिक्की विक्रेत्याला थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. कानशिलात देखील लागवल्याचे सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर दमबाजी करीत दुकानाच्या गल्ल्यातील पैसे घेऊन ह्या अज्ञात चोरांनी पळ काढला.
सदर घटनेमुळे लोणावळ्यातील दुकानदार व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. लोणावळा हे पर्यटनस्थळ असून वेगवेगळ्या शहारातून पर्यटक लोणावळ्यात येतात, अशावेळी ह्या घटनांकडे पोलिसांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. लोणावळा पोलीस सदर प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सोमाटणे, वरसोली येथील टोलनाके बंद होणार नाही? सरकारच्या उत्तरामुळे नागरिकांमध्ये मोठी निराशा, आमदार शेळकेंच्या प्रश्नामुळे वास्तव उघड
– पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर – वाचा सविस्तर
– तळेगाव-चाकण रस्त्याची दूरवस्था ; आमदार सुनील शेळके प्रचंड आक्रमक, तातडीने खड्डे बुजविण्याची सरकारकडे मागणी