Dainik Maval News : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानिमित्त लोणावळ्यात मावळी पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दरम्यान तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. यामध्ये सर्व राजकीय पक्ष, लायन्स क्लब पदाधिकारी, नागरिक व माजी सैनिक सहभागी झाले होते.
- ऑपरेशन सिंदूर ही पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना व भारतमातेच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीरांना श्रद्धांजली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
मावळी पुतळा येथून पदयात्रेची सुरुवात होऊन जयचंद चौक, बाजारपेठ, गुरुद्वारामार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे समारोप झाला. यावेळी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
दरम्यान, नेत्यांनी भारताच्या सैनिकांचे कौतुक केले. याप्रसंगी माजी सैनिक बाळासाहेब कडू, महेश थत्ते, एच. सी. शर्मा तसेच विद्यार्थिनी वसुंधरा शिळीमकर यांचा सन्मान करण्यात आला.
माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, वृंदा गणात्रा, योगिता कोकरे, श्रीधर पुजारी, दादा धुमाळ, बाबा शेट्टी, अरविंद कुलकर्णी, रामविलास खंडेलवाल, राजाभाऊ खळदकर, देविदास कडू, नारायण पाळेकर, अनंता गायकवाड, संजय भोईर, कमुभाई जसदनवाला, अमीन वाडीवला, विजय सिनकर, दिलीप गुप्ता, अर्जुन पठारे आदी यावेळी उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या सुधारणा प्रकल्पाबाबत अधिकृत शासन आदेश जारी । Talegaon Chakan Shikrapur Road
– वडीवळे धरण डावा-उजवा कालवा बंदिस्त करणे आणि आढले-डोणे उपसा जलसिंचन योजनेचा डीपीआर तयार करण्याचे निर्देश । Maval News
– मोठी बातमी : मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भंडारा डोंगराला भेदून जाणार नाही ; रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन