व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, February 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मेंढपाळ बाबा निघाले घरला… कोकणात उतरलेल्या मेंढपाळांचा परतीचा प्रवास सुरू

गावोगावी मुक्काम करीत आपल्या लेकरासारख्या शेळ्या मेंढ्यांचे पोट भरत मेंढपाळ फिरत असतात.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 24, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
Shepherds who went to Konkan begin their journey back home

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : दसरा – दिवाळी सण घरी उरकल्यानंतर घाटावरील मेंढपाळ आपल्या शेळ्या मेंढ्यांचा वाडा घेऊन ओल्या चाऱ्याच्या आणि पाण्याच्या शोधात भटकंती सुरू करतात. त्यांची ही भटकंती कोकणात खलाटी पर्यंत सुरू असते. गावोगावी मुक्काम करीत आपल्या लेकरासारख्या शेळ्या मेंढ्यांचे पोट भरत मेंढपाळ फिरत असतात.

  • साधारण दिवाळी झाल्यानंतर कोकण दिशेने सुरू झालेला त्यांचा प्रवास पाऊसाची चाहूल लागताच संपतो. मिरगाची चाहूल लागताच मान्सून सुरू होण्याआधी आपलं घर गाठण्यासाठी ते पुन्हा घाटाखालून घाटावर येण्यासाठी परतीचा प्रवास सुरू करतात. पिढ्यानपिढ्या आणि वर्षोनवर्षे हीच वाट चालणारे मेंढपाळ धनगर पूर्वजांची परंपरा आणि पोटपाण्याचा हा व्यवसाय विनातक्रार करीत आहे.

वर्षानुवर्षांच्या वाटचालीने गावोगावची माणसे त्यांनी आपलीशी केली आहेत. त्यामुळे ज्या गावात त्यांचा वाडा उतरतो तिथे त्यांना गावकरी, ओळखी पाळखीचे लोकं आवडीने विचारपूस करून ठेवून घेतात. असाच हा प्रवास कोकणात आतपर्यंत होतो. पुन्हा माघारी जाताना वेगळा रस्ता, वाटेत वीर शिंग्रोबाचे दर्शन घेऊन हे मंडळी बारामती, सुपा भागात परततात. सध्या मावळ प्रांतात माघारी निघालेल्या मेंढपाळांचे आणि त्यांच्या शेळ्या-मेंढ्यांच्या वाड्यांचे दर्शन होत आहे.

‘आम्ही मूळ बारामतीतले. दरवर्षी वाडा घेऊन कोकणात उतरतो. शेळ्या मेंढ्यांना चारा मिळावा आणि चार पैशांचा व्यवसाय व्हावा यासाठी बारामती ते कोकण प्रवास करतो. आता पाऊस सुरू होईल, त्याआधी घर गाठायचं म्हणून परतीचा प्रवास सुरू केलाय. दिवाळीनंतर घर सोडतो, त्यानंतर पावसाच्या आधी घरी जायचं असतं.’ – भिवा पिंगळे, बारामती

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या सुधारणा प्रकल्पाबाबत अधिकृत शासन आदेश जारी । Talegaon Chakan Shikrapur Road
– वडीवळे धरण डावा-उजवा कालवा बंदिस्त करणे आणि आढले-डोणे उपसा जलसिंचन योजनेचा डीपीआर तयार करण्याचे निर्देश । Maval News
– मोठी बातमी : मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भंडारा डोंगराला भेदून जाणार नाही ; रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन


Previous Post

लोणावळा : सर्वपक्षीय तिरंगा यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; माजी सैनिकांचा केला सन्मान । Lonavala News

Next Post

चांगला निर्णय : मतदारांसाठी मतदान केंद्राबाहेर मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार – भारत निवडणूक आयोग

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
ECI Central Election Commission

चांगला निर्णय : मतदारांसाठी मतदान केंद्राबाहेर मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार - भारत निवडणूक आयोग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Chief Minister reviews general district annual plans of Pune district

मुख्यमंत्र्यांकडून पुणे जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा

February 15, 2026
Prostitution business on old Pune-Mumbai highway Many dens in Talegaon Vadgaon Dehu Road Somatane

Maval Crime : वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून सार्वजनिक शिष्ठाचाराचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हे

February 15, 2026
Lord-Shankar-Temple-In-Maval-Taluka

मावळ तालुक्यातील ‘ही’ प्रसिद्ध शिवमंदिरे प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात एकदा तरी नक्की पाहावीत, जाणून घ्या । Famous Shiva Temples in Maval Taluka

February 15, 2026
Raje Shiv Chhatrapati Jayanti Festival 2026 Committee at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथील राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव २०२६ समिती अध्यक्षपदी कुलदीप ढोरे, कार्याध्यक्षपदी संतोष भिलारे

February 14, 2026
On occasion of Mahashivratri Akhand Harinam saptah at Shri kshetra Ghoravadeshwar Maval

महाशिवरात्री निमित्त PMPML कडून मावळातील श्री क्षेत्र घोरवडेश्वर इथे जाण्यासाठी रविवारी विशेष बससेवा

February 14, 2026
Crime

चुलत भावाकडून तरूणाचा खून, आरोपी फरार ; मावळातील धक्कादायक घटना, पोलिसांकडून तपास सुरू

February 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.