लोणावळ्यातील एका हाॅटेलमध्ये सुरू असलेला वेश्या व्यवयासाचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या कारवाईत पोलिसांनी हाॅटेल मालकासह एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
लोणावळा शहरातील मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या सदर हॉटेलवर वेश्याव्यवसाय प्रकरणी लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी धडक कारवाई करत दोन महिलांची सुटका केली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर सुदर्शन हाॅटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत, बनावट ग्राहक बनून पोलिसांच्या पथकाने तिथे छापा टाकला. या कारवाईत हाॅटेल मालक सतीश शेट्टी (वय 59) याच्यासह एका महिलेच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच, सदर कारवाईत दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची रवानगी निरीक्षणगृहात करण्यात आली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक कारंडे, सहाय्यक फौजदार मारुती गोफणे, अण्णा बनसोडे, हवालदार मसळे, शिंदे आदींनी ही कारवाई केली. लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम डुबल तपास करत आहेत. सहायक फाैजदार मारुती गोफणे यांनी या संदर्भात फिर्याद दिलीये.
अधिक वाचा –
– नाशिकजवळच्या जिंदाल कारखान्यात बॉयलरचा स्फोट, दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
– सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत शोभेच्या दारूच्या कारखान्यात भीषण स्फोट, 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू