देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त वडगाव शहर भाजपच्या वतीने ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात झालेल्या चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ आणि अटल दिनदर्शिका 2023 प्रकाशन सोहळा माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे हस्ते आणि मावळ भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, मा सभापती रेवतीताई वाघवले यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वडगाव शहर भाजपाने प्रकाशित केलेल्या अटल दिनदर्शिका मधील सरकारी योजणांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे मत बाळा भेगडे ( Bala Bhegade ) यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. अटल दिनदर्शिकाच्या (5000) पाच हजार प्रति छापण्यात आल्या असून त्याचे वडगाव शहरामध्ये घरोघरी वाटत करण्यात येणार आहे, असे वडगाव भाजपाचे अध्यक्ष अनंता कुडे यांनी सांगितले. ( Atal Calendar 2023 Release By BJP Maval And Distribute Prizes To Winners Of Rangoli And Painting Competition At Vadgaon )
हेही वाचा – वडगाव भाजपाकडून स्वर्गीय पंतप्रधान अटलजींच्या जयंतीनिमित्त चित्रकला आणि रांगोळी स्पर्धा
याप्रसंगी मा सभापती गुलाबराव म्हाळसकर, मा उपसभापती दिपाली म्हाळसकर, मा उपसभापती नगरसेवक प्रविण चव्हाण, मावळ भाजपा महिला मोर्चा मा युवती अध्यक्षा राणी म्हाळसकर, कार्याध्यक्ष प्रसाद पिंगळे, संघटन मंत्री किरण भिलारे, ऍड विजय जाधव, मा अध्यक्ष नारायण ढोरे, अरविंद पिंगळे, सुरेश चव्हाण, विठ्ठलराव घारे, शरदराव गुरव, मधुकर पानसरे, उपाध्यक्षा ज्योतीताई काटकर, मा सरपंच संभाजी म्हाळसकर, सुधाकर ढोरे, सोमनाथ काळे, नगरसेवक शंकर भोंडवे, भुषण मुथा, श्रीधर चव्हाण, अनुसूचित जाती अध्यक्ष दीपक भालेराव, संपत म्हाळसकर, युवक अध्यक्ष विनायक भेगडे, दीपक पवार, प्रसिद्धीप्रमुख अमोल ठोंबरे, संजय जानेराव आदीसह कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा शहर अध्यक्ष अनंता कुडे, सूत्रसंचालन सरचिटणीस मकरंद बवरे आणि आभार सरचिटणीस कल्पेश भोंडवे यांनी मानले.
अधिक वाचा –
– नववर्षाचे दणक्यात स्वागत! मावळ तालुक्यात पर्यटकांचा महापूर, पर्यटनस्थळी 2023 चे जल्लोषात वेलकम । Happy New Year 2023
– मोठी कारवाई! लोणावळ्यात वेश्याव्यवसाय प्रकरणी हॉटेलवर छापा, दोन महिलांची सुटका