Dainik Maval News : एकेरी वाहतूकीच्या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या 160 वाहन चालकांवर लोणावळा शहर पोलीस स्टेशनकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईसह वाहन चालकांनी सदर एकेरी मार्गांच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन लोणावळा शहर पोलीस ( Lonavala city police ) ठाण्यातर्फे करण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
लोणावळा शहरात वाहतूक सुरळीत चालण्यासाठी लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते इंद्रायणी पुल ते रानडे हॉस्पीटल अशी एकेरी वाहतुकीचे नियमन करून त्याबाबत ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. असे असतानाही वाहन चालक वारंवार सदर आदेशाचा भंग करुन एकेरी मार्गाचे उल्लघंन करत असल्याचे निदर्शनास आले. ( Lonavala city police action against 160 motorists who violated the one way traffic order )
त्या अशा वाहन चालकांना अटकाव करण्यासाठी सोमवारी, दि. 29 जुलै रोजी विशेष मोहीम राबवून एकेरी मार्गाचे उल्लघंन करणाऱ्या एकुण 160 मोटार वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी केले आहे.
अधिक वाचा –
– पर्यटन बंदी विरोधात लोणावळ्यात टॅक्सी असोसिएशनचा पायी मोर्चा, प्रशासनाला निवेदन देत तीव्र आंदोलनाचा इशारा । Lonavala News
– टाकवे बुद्रुक येथून अपहरण झालेल्या ‘त्या’ अल्पवयीन मुलीचा शोध लागला, तीन आरोपी ताब्यात, वडगाव मावळ पोलिसांची कामगिरी
– दावे निकाली काढण्यात पुणे जिल्हा राज्यात प्रथम ; राष्ट्रीय लोक अदालतीत १ लाखाहून अधिक दावे निकाली । Pune News