व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, April 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

टाकवे बुद्रुक येथून अपहरण झालेल्या ‘त्या’ अल्पवयीन मुलीचा शोध लागला, तीन आरोपी ताब्यात, वडगाव मावळ पोलिसांची कामगिरी

आंदर मावळातील टाकवे बुद्रुक येथून एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे शुक्रवारी, दि.19 अपहरण झाले होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 30, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे
Vadgaon-Maval-Police-Station

File Photo


Dainik Maval News : आंदर मावळातील टाकवे बुद्रुक येथून एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे शुक्रवारी, दि.19 अपहरण झाले होते. याबाबत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अल्पवयीन मुलीचे अपहरण करताना आरोपींनी चेहरा झाकून आणि विना नंबरप्लेटच्या मोटारसायकलचा वापर केला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

सदरचा गुन्हा संवेदनशिल आणि गंभीर स्वरूपाचा असल्याने तपासासाठी सहा पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड यांच्या नेतृत्वाखाली एकूण सहा तपास पथके तयार करून मुंबई, लोणावळा, कामशेत, तळेगाव, देहूरोड, हिंजवडी भागात सदर मुलीचा शोध घेतला गेला. गोपनीय बातमीदार यांच्या आणि तांत्रिक माहितीच्या आधारे सदर मुलीचा शोध घेतला असता दहा दिवसाच्या अथक परीश्रमानंतर, सखोल तपासात ही मुलगी हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हददीत सुखरूप मिळून आली. ( Kidnapped girl traced from Takwe Budruk Performance of Vadgaon Maval Police )

पोलिसांनी या प्रकरणात अनिकेत उमेश शेळके (वय 20 वर्षे, रा. माण, ता. मुळशी, जि पुणे) ओमकार अरुण कुंभार (वय 18 वर्षे, रा.कुंभार वस्ती, माण, ता. मुळशी, जि. पुणे), निखिल धोड तळपे (वय 18 वर्षे, सध्या रा. भोसले वस्ती, महिला व्यायाम शाळेसमोर, माण, ता. मुळशी मुळ रा साकूर्डी, ता. खेड, जि पुणे) या आरोपींना अटक केलेली असुन न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केलेली आहे. तसेच या गुन्ह्यात अजून दोन अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालकांना बाल न्याय मंडळ येथे हजर केले आहे.

सदरची कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड, सुनिल जावळे, सचिन गायकवाड, सचिन देशमुख, विशाल जांभळे, सचिन काळे, गणपत होले, अमोल तावरे, शशिकांत खोपडे, बापुराव गावडे, सिध्दार्थ वाघमारे, संपत वायाळ, आदित्य भोगाडे, चेतन कुंभार, किरण डोले, प्रतिक राले, देविदास भागे, चेतन दळवी, नेहा भोर, आरती खर्डे, पोलिस पाटील अतुल असवले यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड हे करत आहेत.

पालकांनी मुलांकडे लक्ष देणे आवश्यक –
“पालकांनी पौगांडवस्थेतील मुलांचे मित्र, त्यांचे सोशल मीडिया यावर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. मुलांना वेळोवेळी विश्वासामध्ये घेऊन वेळोवेळी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.” – कुमार कदम, पोलीस निरीक्षक, वडगाव मावळ पोलीस ठाणे.

अधिक वाचा –
– पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकणाऱ्या ‘मनु भाकर’वर अभिनंदनाचा वर्षाव । Manu Bhaker
– पुणे जिल्ह्यातील धरणांची सद्यस्थिती काय, कोणत्या धरणात किती टक्के पाणीसाठा? वाचा एका क्लिकवर । Pune News
– उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरती, वृक्ष लागवड आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान । Lonavala News


Previous Post

दावे निकाली काढण्यात पुणे जिल्हा राज्यात प्रथम ; राष्ट्रीय लोक अदालतीत १ लाखाहून अधिक दावे निकाली । Pune News

Next Post

पर्यटन बंदी विरोधात लोणावळ्यात टॅक्सी असोसिएशनचा पायी मोर्चा, प्रशासनाला निवेदन देत तीव्र आंदोलनाचा इशारा । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Lonavala Khandala Taxi Association

पर्यटन बंदी विरोधात लोणावळ्यात टॅक्सी असोसिएशनचा पायी मोर्चा, प्रशासनाला निवेदन देत तीव्र आंदोलनाचा इशारा । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Talegaon Dabhade Municipal Council starts pre-monsoon drain cleaning work

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाला सुरूवात । Talegaon Dabhade

April 29, 2026
Dr Babasaheb Ambedkar residence anniversary celebrated with enthusiasm at Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान वर्धापन दिन उत्साहात साजरा

April 29, 2026
Aaple Sarkar Seva Kendra inaugurated at Talegaon Dabhade Municipal Council

लोकसेवा हक्क दिनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन । Talegaon Dabhade

April 29, 2026
Shooting scare in Dehu Road BJP worker killed

देहूरोडमध्ये गोळीबारचा थरार ! भाजपा कार्यकर्त्याची हत्या

April 29, 2026
Maval taluka shaken Youth burnt along with bike body found in field along Mahagaon Dhalewadi road

मावळ तालुका हादरला ! दुचाकीसह जळालेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळला

April 28, 2026
Parking problem in Lonavala city will be solved railway administration will develop parking lot

लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

April 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.