Dainik Maval News : लोणावळा येथे अभिनेता अरमान कोहली याच्या घरात चोरीची घटना घडली होती. 25 मार्च 2025 रोजी अभिनेत्याच्या घरातून 1 लाख रुपये रोख आणि 12 तोळ्यांची सोन्याची चेन चोरीला गेली. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
- अरमान कोहली यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या घरातील कामगार आकाश गौड (वय 21) आणि संदीप गौड (वय 23) यांनी ही चोरी केली होती. त्या माहितीनुसार लोणावळा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी वसई येथे असल्याची माहिती मिळवली. पुणे ग्रामीण पोलिसांनी वसई येथे जाऊन दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी चोरीची कबुली दिली असून, ते मूळचे उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील आहेत.
पोलिसांनी आरोपींना वालीव पोलीस ठाण्यात नोंद करून वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी लोणावळा शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा विकास व्हावा ; शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळावा – आमदार सुनिल शेळके
– मावळ तालुक्यातील इंदुरी येथील भुईकोट किल्ल्यावर 61 फुटी भगव्या ध्वजाचे लोकार्पण । Maval News
– मोठी बातमी : श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी जालिंदर मोरे यांची निवड ; चुरशीची लढतीत 63 मतांनी विजयी । Dehu News