डोंगरगाव-वाडी परिसरातून बेपत्ता झालेल्या मयंक रुतुराज या पाच वर्षाच्या मुलाचा शोध लागला आहे. हा मुलगा जवळच केवरेगाव येथे सापडला आहे. खेळता खेळता तो दूरवर गेला होता. परंतू, त्याच्या घरच्यांना मुलगा दिसेना झाल्याने ते हैराण झाले आणि त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. यावेळी अनेकांनी सोशल मीडियावर त्याच्याबद्दल आवाहन केले होते. त्यानंतर अवघ्या तीन तासात त्याची माहिती मिळाली. केवरे गावचे युवा सेनेचे उपशाखा प्रमुख आणि भाई-ग्रुप महाराष्ट्र राज्य सदस्य, साहिल संतोष बोके यांनी याबद्दल माहिती दिली. ( Lonavala Dongargaon Missing Child Found In Three Hours Thanks To Social Media )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन
– मुंढावरे ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्याचा आमदार शेळकेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश