माहिती – निखिल भोसले, शहर अध्यक्ष, लोणावळा, मनसे
Dainik Maval News : महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहर यांच्या वतीने दोन दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट वायरल करण्यात आली होती की, लोणावळ्यातील कोणतीही जी शाळा मुलांच्या फी साठी अडवणूक करत असेल आणि विद्यार्थी यांना शिक्षणापासून वंचित ठेवत असेल तर त्या शाळेला मनसेच्या रोषाला सामोरे जावे लागेल.
सदर पोस्ट वाचून लोणावळा शहर लगत असलेल्या कुसगाव बु. येथील जगन्नाथ कांबळे यांनी मनसे शहर अध्यक्ष लोणावळा, निखिल भोसले यांना संपर्क केला आणि लोणावळा शहरातील किंग्स वे या शाळेने माझ्या तीन मुलांचा शाळेचा दाखला 53,000 फी बाकी असल्याने देत नाही अशा स्वरूपाची सदर माहिती मनसे पदाधिकारी यांना दिली.
त्यानंतर माहिती घेतल्यानंतर सदरची शाळा ही परवानगी नसल्याकारणाने बंद केली गेली आहे. त्यामुळे दुसऱ्या शाळेत मुलांचे ॲडमिशन करण्यासाठी शाळेचा दाखला गरजेचा असताना संबंधित शाळेने फी न भरल्या कारणाने माझ्या तीनही मुलांचे दाखला व गुणपत्रिका त्या शाळेने अडवून ठेवले आहे. आम्ही हे सर्व पडताळून पाहिले असता खरंच जगन्नाथ कांबळे यांची सध्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याकारणाने ते खरंच शाळेची फी भरू शकत नाही असे आम्हास दिसून आले.
त्यांनंतर मनसेने श्री कांबळे यांना व मुलांना सोबत घेऊन किंग्ज वे या शाळेवरती धडक देऊन मनसे अध्यक्ष निखिल भोसले व मनसे प्रवक्ते अमित भोसले यांनी मनसेच्या पद्धतीने बोलणी करून वैभवी कांबळे १० वी, साक्षी कांबळे ६ वी, आणि आदित्य कांबळे ४ थी या तीनही मुलांचे दाखले श्री कांबळे यांना मिळवून दिले. त्यानंतर त्या श्री कांबळे कुटुंबियांनी मनसेचे आभार मानले.
तरी लोणावळा शहरातील सर्व नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहर आव्हान करीत आहे की अशा कुठल्याही शाळेने फी भरली नसल्याकारणाने मुलांची अडवणूक करीत असेल तर आपण मनसेचे संपर्क साधावा. याप्रसंगी मनसे पदाधिकारी संदीप बोभाटे, सुनील सोनवणे, सुभाष रेड्डी, जुबेर मुल्ला,आकाश सावंत, कैवल्य जोशी,नरेश महामुनी आदी जण उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळचा आधारवड हरपला ! मावळभूषण, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन । Former MLA Krishnarao Bhegde Passes Away
– “कृष्ण मेघांची छाया हरपली…” स्व. कृष्णराव भेगडे यांचे कधीही न पाहिलेले फोटो – पाहा फक्त दै. मावळवर । Krishnarao Bhegde Passes Away
– मोठी बातमी! श्री एकविरा देवस्थानकडून ड्रेस कोड जाहीर; महिला-पुरुषांनी मंदिरात येताना ‘असे’ कपडे परिधान करणे बंधनकारक