Dainik Maval News : लोणावळा शहरातील पायाभूत सुविधा, सुरक्षा यांना सामाविणारा 2025-2026 आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे. तब्बल 129 कोटी 19 लाख 98 हजार 952 रुपयांचा अर्थसंकल्प मुख्याधिकारी तथा प्रशासन अधिकारी अशोक साबळे यांनी मंजूर केला आहे.
पालिकेच्या या अर्थसंकल्पामध्ये पर्यटन नगरी लोणावळा शहरातील पर्यटन व विकास योजनांना चालना देण्यात आली असून शहराच्या सौंदर्यात आणखीन भर टाकण्याच्या योजनांचा समावेश आहे.
- अर्थसंकल्पातील खास बाब म्हणजे सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या मालमत्ता व शहरातील मुख्य ठिकाणांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसविण्यासाठी 50 लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.
सोबत शहरातील डांबरी रस्त्यांसाठी तब्बल 7 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद, भुयारी गटार योजना राबविण्यासाठी 2 कोटी 80 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, ज्यामुळे शहराची स्वच्छता आणि आरोग्य सुविधा सुधारल्या जाणार आहेत.
यंदाच्या अर्थसंकल्पाची महत्वाची बाब म्हणजे कोणतीही कर व दरवाढ करण्यात आलेली नाही. परंतु या आर्थिक वर्षापासून प्रथमच स्विमिंग पूल परवाना शुल्क पाच हजार रुपये आकारले जाणार आहे.
सोबत वलवण तलाव विकास योजनेसाठी नवीन हेड तयार करण्यासाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना पर्यटनाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. ( Lonavala Municipal Council approves Rs 129 crore budget for 2025-2026 financial year )
तसेच, लोणावळा नगर परिषदेच्या तुंगार्ली डॅम येथे मनोरंजन नगरी व विविध विकासकामांसाठी प्राथमिक खर्चासाठी 30 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ह्या कामामुळे लोणावळा शहर आणखीन आकर्षक बनण्यास मदत होईल.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अभ्यासिकेत अभ्यास केलेले चार विद्यार्थी बनले अधिकारी ; मुख्याधिकाऱ्यांनी केला सन्मान । Talegaon Dabhade
– देहू नगरपंचायतीला यात्रा अनुदान कधी मिळणार? नागरिकांच्या मिळकत करातून होतोय कोट्यवधीचा खर्च । Dehu News
– पिंपरी-चिंचवड शहरासाठी मुळशी धरणातील पाणी आरक्षणाची मागणी ; मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना निवेदन